आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बीजोत्पादन करण्याकडे कल वाढला आहे. राजुरी येथील रघुनाथ हाडवळे यांनी कांदा बीजोत्पादनासाठी लावलेले कांदा पीक भरण्याच्या अवस्थेत असून, ते फुलोऱ्यात आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये यंदा चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षी कांदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी बियाण्यांना सोन्याचा भाव प्राप्त झाला होता.
एक हजार रुपयांना मिळणारे कांदा बी पाच हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. त्यातच कंपन्यांकडून आलेल्या बोगस बियाण्यांमुळे कमॊठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता.
अधिक माहितीसाठी क्लिक करा