हळद लागवडीच्या काळात वाढते तापमान, गतवर्षी झालेला कमी पाऊस, आणि यंदाचा सततचा पाऊस यामुळे देशातील हळद उत्पदक घेणाऱ्या राज्यात या साऱ्याचा परिणाम हळद लागवडीवर झाला. यामुळे लागवड लांबणीवर पडली त्यातच हळद बियाण्याची टंचाई आणि वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशात ३५ हजार हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट झाली असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राने दिली आहे.
देशात गतवर्षी म्हणजे सन २०२३-२४ मध्ये ३ लाख ५ हजार १८२ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. गेल्या २ ते ३ वर्षात हळदीला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी हळद लागवडीसाठी पुढे येत आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा