बाजारपेठेत डाळिंबाची अवाक व मागणी चांगली असल्याने हस्त बहरातील डाळिंबाचे दर टिकून आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंबावर बसू लागला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत डाळिंबाचे दर टिकून राहण्याचा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या डाळिंबास प्रति किलोस १०० ते १७५ रुपये असा दर मिळत आहे.
यंदा राज्यात ३० हजार हेकटरवर डाळिंबाचा बाहेर शेतकऱ्यांनी धरला असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतहि शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बाग धरल्या आहेत.
https://agrowon.esakal.com/market-intelligence/pomegranate-price-is-rs-100-to-rs-175-per-kg-rat16