राज्य सरकारने मंगळवारी (ता. ४) रब्बी अनुदानासाठी ७ हजार ८४५ कोटी रुपये वाटपास मंजुरी दिली आहे. यात मराठवाड्यात सर्वाधिक ४ हजार ४८६ कोटी रुपये वाटप होणार आहेत. तर विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार ५४४ कोटी रुपये वाटप होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एनडीआरएफ’च्या मदतीव्यतिरिक्त रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये अनुदान मंजूर केले होते. वेगवगेळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आता अनुदान मंजूर करत आहे. राज्य सरकारने मंगळवारी (ता. ४) शासन आदेश काढत २८ जिल्ह्यांसाठी ७ हजार ८४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/govt-approves-7845-crore-rabi-subsidy-rat16

माहिती शेअर करा