फुलनिर्मितीस लागणारे सर्वात महत्वपूर्ण घटक म्हणजे कॅल्शियम, बोरॅान, झिंक. कॅल्शियमचा वापर हा पेशींच्या निर्मितीसाठी व विभाजनासाठी केला जातो. तो झाडांच्या पेशींमधील महत्वाचा घटक आहे. फ़ुलातील स्रीकेशर निर्मितीसाठी बोरॅान व पु्ंकेसर निर्मितीसाठी झिंक सर्वात महत्वाचा घटक आहे. पोलनटूयबची लांबी व जाडी वाढवण्यासाठी कॅल्शियम व बोरॅानची महत्वाची भुमिका आहे. परागकणांचे आयुष्य हे खुप कमी असते. परागीकरण १००% यशस्वी होण्यासाठी परागकणांचे आयुष्यमान वाढविणे खूप गरजेचे असते. त्यासाठी झिंकची महत्वाची भुमिका आहे. म्हणून कॅल्शियम, बोरॅान, झिंकच्या एकत्र वापराने एकसारखी फुलनिर्मिती होते.

माहिती शेअर करा