सोयाबीन लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
सोयाबीन पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. दाट व जमिनीलगत वाढणारी पानरचना: फवारणी द्रावण अनेकदा खालच्या पानांपर्यंत व खोडापर्यंत पोहोचत नाही. २. कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव: खोड किडा (गर्डल बीटल), सेमीलूपर, खोडमाशी, करपा (रस्ट) व पानांवरील डाग यांसाठी वेळेवर फवारणी आवश्यक. ३. पावसाळ्यात वारंवार फवारणीची गरज: पावसामुळे फवारणीसाठी उपलब्ध वेळ कमी होतो व फवारलेले औषध वाहून जाण्याची शक्यता वाढते. सोयाबीन पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था: फुलोरा → शेंग निर्मिती ⭐ सोयाबीन पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये ,मुख्य अन्नद्रव्य: स्फुरद ,महत्त्वाची सूक्ष्मअन्नद्रव्ये: मॉलिब्डेनम व बोरॉन
सोयाबीन पिकात स्फुरद, मॉलिब्डेनम व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. प्रथिन (Protein) निर्मितीस मदत करतात २. फुले व शेंगा गळणे कमी करतात ३. लवकर व एकसारखी फुलधारणा घडवून आणतात ४. शेंग निर्मिती सुधारून उत्पादन वाढवतात सोयाबीन पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. दाट सोयाबीन पिकावर समान व अचूक फवारणी २. ड्रोनच्या डाऊनड्राफ्टमुळे खालच्या पानांपर्यंत उत्तम प्रवेश ३. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ४. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, जस्त, मोलिब्डेनम
२. शाखीय वाढ अवस्था : नत्र, पालाश, जस्त, लोह
३. कळी अवस्था : स्फुरद, पालाश, बोरॉन, मोलिब्डेनम
४. फुलोरा अवस्था⭐:पालाश, गंधक, बोरॉन, जस्त
५. शेंगा तयार होण्याची अवस्था⭐:पालाश, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन
६. दाणा भरणे अवस्था / परिपक्वता अवस्था :पालाश, मॅग्नेशियम, गंधक