मक्याची लागवड करा: स्मार्ट पोषणाच्या टिप्ससह
मका पिकामधील फवारणीतील प्रमुख अडचणी १. उंच वाढ (६–८ फूट) : ३५–४० दिवसांनंतर हाताने किंवा ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणे कठीण व असमान होते. २. दाट कॅनोपी (पानांची जाडी) : पारंपरिक पद्धतींमध्ये फवारणी द्रावण खालच्या पानांपर्यंत व मुळांच्या भागापर्यंत पोहोचत नाही. ३. मजुरांची कमतरता व जास्त खर्च : खरीप हंगामातील पीक संरक्षणाच्या काळात मजुरांची टंचाई भासते व खर्च वाढतो. ४. फवारणीदरम्यान पिकाचे नुकसान : मजुरांची हालचाल किंवा ट्रॅक्टर प्रवेशामुळे पीक पडणे (लॉजिंग) व पानांची इजा होते. ५ .खत व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा असमान पुरवठा : वाढ असमान होते व उत्पादनात फरक पडतो. मका पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : तुरा येणे → रेशीम अवस्था मका पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये : मुख्य अन्नद्रव्य: नत्र, महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: झिंक
मका पिकात नत्र व झिंक का महत्त्वाचे आहेत? १. एन्झाइम क्रिया व वाढीच्या संप्रेरकांसाठी (ऑक्सिन्स) अत्यावश्यक २. पानांची वाढ व दोन पेऱ्यातील लांबी वाढविण्यास मदत ३. मुळांची वाढ व सुरुवातीचा जोम सुधारतो ४. कणसाचा आकार व दाणे भरणे सुधारते मका पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. उंच व दाट मका पिकातही समान व अचूक फवारणी २. शेतात प्रवेश नसल्याने पिकाचे नुकसान होत नाही ३. हाताने फवारणीपेक्षा ७०–८०% मजुरी खर्चाची बचत ४. ८०–९०% पाण्याची बचत (कमी पाण्यात अचूक फवारणी) ५. वेगवान कामकाज, कमी वेळेत जास्त क्षेत्राची फवारणी ६. अचूक मात्रा फवारणीमुळे खत व रसायनांचा अपव्यय कमी
पीक अवस्था – प्रमुख पोषक घटक
१. उगवण अवस्था : नत्र, स्फुरद, झिंक
२. शाखीय वाढ अवस्था : नत्र, मॅग्नेशियम, झिंक, लोह
३. उंची अवस्था : नत्र, पालाश , गंधक, झिंक
४. तुरा येणे व रेशीम अवस्था ⭐:पालाश, मॅग्नेशियम, बोरॉन, झिंक
५. दाणे भरणे व पक्वता अवस्था :पालाश, नत्र, मॅग्नेशियम