तूर लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
तूर पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. उंच व पसरणारी पीक रचना: ४५–५० दिवसांनंतर हाताने फवारणी करताना फवारणी असमान होते. २. दीर्घ कालावधीचे पीक (१६०–१८० दिवस): वारंवार फवारण्या कराव्या लागल्याने मजुरी व खर्च वाढतो. ३. किडींचा जास्त प्रादुर्भाव: शेंग पोखरणारी अळी, मावा, शेंग माशी यांसाठी वेळेवर व अचूक फवारणी आवश्यक. ४. महत्त्वाच्या टप्प्यांवर मजुरांची कमतरता: फुलोरा व शेंग निर्मितीचा काळ इतर खरीप पिकांशी एकाच वेळी येतो. तूर पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : फुलोरा → शेंग निर्मिती ⭐ तूर पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये,मुख्य अन्नद्रव्य: स्फुरद महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
तूर पिकात स्फुरद व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. मुळांची मजबूत वाढ घडवून आणतात २. फुले व शेंगा गळणे कमी करतात ३. लवकर फुलधारणा होण्यास मदत करतात ४. शेंग निर्मिती व उत्पादन सुधारतात तूर पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. उंच व पसरणाऱ्या तूर पिकात समान फवारणी २. शेतात प्रवेश न केल्याने पिकाचे नुकसान होत नाही ३. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ४. ८०–९०% पाण्याची बचत ५. जलद कार्य : ७ ते १० मिनिटांत १ एकर फवारणी. ६. अचूक डोस वापरल्याने रासायनिक अपव्यय कमी होतो
पीक अवस्था – प्रमुख पोषक घटक
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, जस्त
२. शाखीय वाढ अवस्था : नत्र, पालाश, जस्त, लोह
३. कळी अवस्था : स्फुरद, पालाश, बोरॉन, मोलिब्डेनम
४. फुलोरा अवस्था⭐:पालाश, गंधक, बोरॉन, जस्त
५. शेंगा तयार होण्याची अवस्था⭐:पालाश, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन
६. दाणा भरणे अवस्था / परिपक्वता अवस्था :पालाश, मॅग्नेशियम, गंधक