हरभरा लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
हरभरा पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. कमी उंचीचे व दाट फांद्यांचे पीक: हाताने फवारणी करताना द्रावण आतल्या पानांपर्यंत समान पोहोचत नाही. २. किडींचा जास्त प्रादुर्भाव: शेंग पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा), मावा यांसाठी अचूक व वेळेवर फवारणी आवश्यक. ३. थंड हवामानात रोगांचा प्रादुर्भाव: करपा (विल्ट) व अॅस्कोचायटा ब्लाइट यांसाठी प्रतिबंधात्मक फवारणी गरजेची. हरभरा पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था: फुलोरा → शेंग निर्मिती ⭐ हरभरा पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य: स्फुरद महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
हरभरा पिकात स्फुरद व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. प्रथिन (Protein) निर्मितीस मदत करतात २. फुले व शेंगा गळणे कमी करतात ३. लवकर फुलधारणा घडवून आणतात ४. शेंग निर्मिती सुधारून उत्पादन वाढवतात हरभरा पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. दाट हरभरा पिकावर समान व अचूक फवारणी २. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे आतील भागात उत्तम प्रवेश ३. शेतात प्रवेश न केल्याने पिकाचे नुकसान होत नाही ४. ६०–७०% मजुरी खर्चाची बचत ५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, जस्त, मोलिब्डेनम
२. शाखीय वाढ अवस्था : नत्र, पालाश, जस्त, लोह
३. कळी अवस्था : स्फुरद, पालाश, बोरॉन, मोलिब्डेनम
४. फुलोरा अवस्था⭐:पालाश, गंधक, बोरॉन, जस्त
५. घाटे तयार होण्याची अवस्था⭐:पालाश, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन
६. दाणा भरणे अवस्था / परिपक्वता अवस्था :पालाश, मॅग्नेशियम, गंधक