भात /तांदूळ लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
भात पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. पाणी साचलेली शेती: पाण्यात उभ्या असलेल्या शेतात हाताने किंवा ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणे कठीण व धोकादायक असते. २. मऊ व चिखलयुक्त जमीन: ट्रॅक्टर प्रवेशामुळे चाकांचे खोल खड्डे (रट्स) पडतात व रोपांचे नुकसान होते. ३. कीड व रोगांचा तीव्र प्रादुर्भाव: तपकिरी तुडतुडा, खोड पोखरणारी अळी, पान गुंडाळणारी अळी, ब्लास्ट व शीथ ब्लाइट यांसाठी वेळेवर फवारणी आवश्यक. ४. पीक हंगामात मजुरांची कमतरता: रोप लागवड (लावणी) व फवारणीचा कालावधी एकाच वेळी येतो. भात पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : कणिशा (पॅनिकल) निर्मिती भात पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य: नत्र,महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: झिंक
भात पिकात नत्र व झिंक का महत्त्वाचे आहेत? १. रोपांची सुरुवातीची पकड व वाढीसाठी अत्यावश्यक २. फुटव्यांची संख्या वाढवतात ३. एन्झाइम क्रिया व वाढीच्या संप्रेरकांना सक्रिय करतात ४ .नत्राचा वापर कार्यक्षमता वाढवतात भात पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. शेतात प्रवेश न करता फवारणी—पाणी साचलेल्या शेतासाठी आदर्श २. मोठ्या भातशेती क्षेत्रावर समान व अचूक फवारणी ३. ७०–८०% मजुरी खर्चाची बचत ४. ८५–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था: नत्र , स्फुरद, गंधक, जस्त
२. फुटवा अवस्था: नत्र, पालाश, मॅग्नेशियम, जस्त
३. जास्त फुटवा अवस्था:नत्र, पालाश, गंधक
४. ओंब्या निर्मिती अवस्था⭐:नत्र, पालाश, जस्त, बोरॉन
५. फुलोरा अवस्था : नत्र, पालाश, मॅग्नेशियम
६. दाणा भरणे अवस्था :पालाश, नत्र , मॅग्नेशियम