अतिवृष्टीमुळे जमिनीच्या आरोग्यावर होणारा परिणाम

भारतीय शेती ही मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर आधारित आहे. योग्य प्रमाणातील पाऊस पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असला तरी सततचा अतिवृष्टीचा पाऊस जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर गंभीर परिणाम करू शकतो. बदलत्या हवामानामुळे अनेक भागांमध्ये अल्प कालावधीत जास्त पर्जन्यमान होत आहे. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन, मुळांची कार्यक्षमता, सूक्ष्मजीवांची संख्या आणि उत्पादनक्षमता यावर दीर्घकालीन परिणाम दिसून येत आहेत. […]

मातीचा pH आणि EC म्हणजे काय? आणि शेतीत त्याचे महत्त्व काय आहे?

शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी फक्त खतांचा वापर पुरेसा नसतो, तर मातीचे आरोग्य समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. मातीच्या आरोग्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक म्हणजे pH (पीएच) आणि EC (इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी). हे दोन्ही घटक पिकांच्या वाढीवर, अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर आणि उत्पादनावर थेट परिणाम करतात.  मातीचा pH म्हणजे काय? मातीचा pH म्हणजे मातीची आम्लता (Acidity) किंवा क्षारता (Alkalinity) मोजण्याचे […]

मातीतील सेंद्रिय कर्ब (SOC) म्हणजे काय? आणि तो वाढवणे का महत्त्वाचे?

शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतात, परंतु मातीचे आरोग्य सुधारल्याशिवाय टिकाऊ आणि नफा देणारी शेती शक्य नाही. मातीच्या आरोग्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon ). मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे  प्रमाण योग्य असल्यास पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता सर्वच बाबतीत सुधारणा होते.  सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? मातीमध्ये असलेले कुजलेले वनस्पती […]

मातीचे आरोग्य का महत्त्वाचे आहे?

शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन पद्धती आणि विविध खतांचा वापर करतात. परंतु या सर्व गोष्टींचा पाया म्हणजे मातीचे आरोग्य. निरोगी माती ही केवळ पिके उगवण्याचे माध्यम नसून ती एक जिवंत आणि सक्रिय प्रणाली आहे जी पिकांच्या वाढीपासून उत्पादनाच्या गुणवत्तेपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आज अनेक ठिकाणी रासायनिक खतांचा अति वापर, सेंद्रिय पदार्थांची […]

ड्रोन तंत्रज्ञान: आधुनिक आणि स्मार्ट शेतीकडे वाटचाल

आजच्या बदलत्या काळात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि शेती अधिक अचूक पद्धतीने व्यवस्थापित करणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे उद्दिष्ट असते. या उद्दिष्टासाठी ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कृषी क्षेत्रात वापरले जाणारे ड्रोन, ज्यांना मानवरहित हवाई वाहने (UAVs) असेही म्हणतात,या ड्रोनच्या मदतीने शेतकरी आपल्या शेताची स्थिती, पिकांची […]

जमिनीतील वनस्पती पोषक तत्वांची सहक्रिया आणि विरोध

वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे अन्न उत्पादनाची मागणी वाढत आहे, ज्यामुळे कृषी प्रणालींवर मोठा दबाव येत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, शेतकरी खते आणि पोषक व्यवस्थापन पद्धतींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. तथापि, खतांचा अतिवापर किंवा असंतुलित वापर जमिनीची सुपीकता कमी करू शकतो आणि पीक उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. पोषक तत्वांच्या वापराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि शाश्वत पीक […]

शोभेची झाडे आणि शाश्वत खत व्यवस्थापन

शोभेची झाडे (Ornamental Plants), बागकाम, लँडस्केप डिझाइन शहरी सुशोभीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. या झाडांचा उपयोग फक्त सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही, तर ते पर्यावरणासाठी फायदेशीर आणि व्यवसायिक दृष्टिकोनातूनही लाभदायक ठरतात. कमी खर्चात आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे यांपासून जास्त नफा मिळवता येऊ शकतो. भारत शोभेच्या झाडांच्या उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असून त्याचा १५% वाटा आहे, तर चीन या क्षेत्रात प्रथम […]

द्राक्ष बाग विश्रांतीच्या कालावधीमध्ये कोणती काळजी घ्यावी?

द्राक्ष बाग विश्रांतीचा कालावधी, खऱ्या अर्थाने नवीन हंगामाची सुरवात असते.द्राक्ष काढणी झाल्यांनतर लगेचच खरड छाटणी घेतली जात नाही. काढणी झाल्यांनतर काही कालावधीसाठी बागेला विश्रांती देणे गरजेचे असते. हंगामात घेतलेले उत्पादन, जमिनीचा पोत, वेलींची अवस्था तसेच विभागातील हवामान यानुसार हा कालावधी वेगवेगळा असु शकतो. खरड छाटणी हा पुढील हंगामात येणाऱ्या उत्पादनाचा पाय असेल, तर विश्रांती कालावधी […]

पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

स्फुरद,पालाश,मँगेनीज, झिंक, बोरॉन व सिलिकॉन ही अन्नद्रव्ये व सॅलिसिलीक आम्ल, जस्मोनिक आम्ल ही संप्रेरके प्रतिकारशक्ती वाढवतात व पिकांना जैविक व अजैविक ताणापासून वाचवतात. स्फुरदामुळे मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे मुळकूज यासारख्या रोगाला बळी पडत नाही. पालाशमुळे पेशींचे बाहेरील आवरण जाड होते त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. मँगेनीज हा घटक लिग्निन व फेनॉल निर्मितीसाठी महत्वाचा आहे. […]

द्राक्ष्याचे घड जिरु नये म्हणुन काय करावे ?

फळछाटणीपुर्वी डोळे चांगले फुगलेले असल्यास छाटणीनंतर ७ दिवसात डोळे फुटण्यास सुरूवात होते, याचं अवस्थेला पोंगा अवस्था असे देखील म्हटले जाते. पोंगा अवस्थेत ढगाळ हवामान व सतत पाऊस राहील्यास, वातावरणात आद्रता १००% असल्यास, तसेच बोदामध्ये पाणी साचलेल्या परिस्थितीमध्ये नायट्रेट नायट्रोजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे जिब्रेलीनसचे प्रमाण वाढते व सायटोकायनिनचे प्रमाण कमी होते. याचाच परिणाम वेलींवर निघणाऱ्या नवीन […]