द्राक्ष बाग विश्रांतीचा कालावधी, खऱ्या अर्थाने नवीन हंगामाची सुरवात असते.
द्राक्ष काढणी झाल्यांनतर लगेचच खरड छाटणी घेतली जात नाही. काढणी झाल्यांनतर काही कालावधीसाठी बागेला विश्रांती देणे गरजेचे असते. हंगामात घेतलेले उत्पादन, जमिनीचा पोत, वेलींची अवस्था तसेच विभागातील हवामान यानुसार हा कालावधी वेगवेगळा असु शकतो. खरड छाटणी हा पुढील हंगामात येणाऱ्या उत्पादनाचा पाय असेल, तर विश्रांती कालावधी हा खरड छाटणीच्या नियोजनाची पायाभरणी असते. कारण फळछाटणी झाल्यांनतर वेलींची झीज झालेली असते. त्यामुळे विश्रांती कालावधीत बागेला ताणावर सोडणे चुकीचे ठरते. कारण उत्पादन घेत असताना वेलींच्या काडीतून, खोडातून तसेच ओलांडयांतून अन्नद्रव्ये वापरली जातात.
एक टन द्राक्षाच्या उत्पादनासाठी खालीलप्रमाणे अन्नद्रव्ये वापरली जातात.
नत्र- ४ ते ८ किलो , स्फुरद- ०.७ ते १.५ किलो व पालाश ३ ते ९ किलो
खरे, तर फळाची पक्वता होत असताना वेलीच्या मुळीची कार्यक्षमता कमी झालेली असते. वेलीची झीज भरून काढायची असेन तर मुळी पुन्हा कार्यक्षम होणे आवश्यक असते. त्यासाठी चांगल्या दर्जाचे ह्यूमिक व फुलविक ऍसिडचे संयुग असणारे उत्पादन वापरल्यास पांढऱ्या मुळांची वाढ सुरु होऊन वेलींची अन्नद्रव्ये शोषणाची क्षमता सुधारते. नत्र एक नैसर्गिक ताण कमी करणारे अन्नद्रव्य आहे, परंतु त्याची कार्यक्षमता फार कमी कालावधीसाठी असते यासाठी DMPP व NET टेकनॉलॉजिचा वापर करून नोवाटेकची उत्पादने तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे नत्राचा ऱ्हास कमी होतो व त्यांची कार्यक्षमता सुधारते. त्याचप्रमाणे वेलीवर अधिक उत्पादन घेतल्यामुळे वेलीची झीज भरून येण्यासाठी वेलीला ऊर्जा स्रोत म्हणून स्फुरद महत्वाची जबाबदारी निभावतो. बऱ्याच नवीन वाणांमध्ये किंवा २ ते ३ वर्षाच्या बागांवर सतत जास्त उत्पादन घेतल्याने खोड चपटी होतात. त्यांचा रसरशीतपणा कमी होतो. तसेच छाटणी एप्रिलच्या मध्यात किंवा मेमध्ये झाल्यास ओलांडे वूडी होतात,तसेच अतिउष्णतेमुळे एक डोळा ठेऊन केलेल्या खरड छाटणीत देखील डोळे मुके होतात व एकसारखी फूट येण्यास अडचण निर्माण होते.
साधारणपणे पाने निघाल्यानांतर पानांचे वय २० दिवसांचे होत नाही. तोपर्यंत ते स्वत:चे अन्न तयार करू शकत नाही. त्यासाठी त्याला वेलीतील अन्नसाठ्यावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे विश्रांती काळातील नियोजन महत्वाचे ठरते.
द्राक्ष काढणीपर्यंत पाने जुनी झालेली असतात त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. यासाठी पानांवरील ताण कमी करण्यासाठी नैसगिर्क अमिनो ऍसिड व सायटोकायनिनचे सुसंग असणारे सिवीड बासफोलिअर अल्गी एस एल(२ मिली/लिटर पाण्यासाठी) बरोबर फेट्रिलॉन कॉम्बी २(०.५ ग्रॅम /लिटर पाण्यासाठी ), बासफोलिअर झिंग डब्लू पी/बासफोलिअर झेड एन फ्लो (०. ५ ग्रॅम /लिटर पाण्यासाठी/ ७५ मिली /एकर) ,बासफोलिअर बोरो एसएल (०.५ मिली /लिटर पाण्यासाठी) याचा एकत्रित वापर केल्यास पानांचे आयुष्य वाढते व कार्यक्षमतेत वाढ होऊन वेलींची झीज भरून येण्यास मदत होते द्राक्ष बाग छाटणीनंतर एकसारखी फुटते, खोडे व ओलांडे रसरशीत होऊन कार्यक्षम मुळी तयार होते यासर्व गोष्टी विश्रांती कालावधीतील नियोजनावर ठरत असतात. ज्यामुळे खरड छाटणीतील नियोजन सोयीचे ठरते .

माहिती शेअर करा