सुरूवातीच्या कालावधीमध्ये वनस्पतीला कायिक वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. कुठलीही होणारी वाढ पेशीची निर्मिती, पेशी विभाजन व पेशीची वाढ या क्रियांवर अवलंबून असते. पेशी निर्मितीसाठी व वाढीसाठी कॅल्शियम या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. पेशीभित्तिकेचा ९३% भाग कॅल्शियमने बनलेला असतो. कॅल्शियमचे वनस्पतींमधील वहन संथगतीने होते, वहनाचा वेग वाढविण्यासाठी बोरॉन महत्वाची भूमिका बजावते. तसेच पेशीविभाजनासाठी बोरॉन गरजेचे असते. वनस्पतीध्ये अन्न व साखरेच्या वहनासाठी पालाश बरोबर लागणारा महत्वाचा घटक बोरॉन आहे. वनस्पतींमधील घडणाऱ्या चयापचयाच्या विविध क्रियांमध्ये फॅास्फरस गरजेचा असतो. फॅास्फरसचा वापर झाडातील पेशीमध्ये प्रोटीन, फॅट्स व साखर यांच्या वहनासाठी केला जातो. फॅास्फरस हा ATP रेणुमधील महत्वाचा घटक आहे, त्यामुळेच त्याला उर्जा निर्मितीचा केंद्रीय घटक म्हणून ओळखले जाते. प्रथिनांच्या निर्मितीच्या प्रत्येक प्रमुख पायरीवर पालाश गरजेचे असते. तसेच वनस्पतींमधील एनझाइमना कार्यरत करण्यासाठी पालाश आवश्यक असते. जसे की, ATP रेणूच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या एनझाइमला उत्प्रेरित करण्यासाठी पालाशमुळे लिग्निन निर्मिती होते व खोडाला मजबूती प्राप्त होते.

माहिती शेअर करा