मॉलिब्डेनम हे कडधान्य पिकात महत्वाचा घटक आहे. मॉलिब्डेनममुळे नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटमध्ये व त्यानंतर अमोनियामध्ये केले जाते. यामुळे झाडामध्ये नत्र पचण्यास मदत होते व त्यामुळे ॲमिनो आल्म व प्रथिने निर्मितीस वेग येतो. प्रथिने निर्मिती, सल्फर पचवण्यासाठी, परागीकण निर्मितीसाठी मॉलिब्डेनम लागते. मॉलिब्डेनम हा फ़्लोएम व झायलेम मधून वाहणारा घटक आहे. जमिनीत मॉलिब्डेनम कमतरता असेल तर कडधान्य पिकात गाठी तयार होत नाहीत. पिकामध्ये नत्र पचवण्यासाठी नायट्रेट रिडक्टेस एन्झाईम लागते व ते तयार कारण्यासाठी मॉलिब्डेनमची आवश्यकता असते. नायट्रोजनेज एन्झाईम निर्मितीसाठी मॉलिब्डेनमची गरज लागते व त्या एन्झाईमुळे नत्र स्थिर होण्यास मदत होते. मॉलिब्डेनमबरोबर लोहाची सुध्दा गरज असते. लोहामुळे गाठींना लाल रंग येतो. इतर अन्नद्रव्यांबरोबर मॉलिब्डेनम् ची फवारणी केली तर सोयाबीनच्या मुळांवर गाठीचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

माहिती शेअर करा