कापूस पिकाला बोरॉन सर्व वाढीच्या अवस्थेत लागतो परंतु जास्त प्रमाणात हा बोंड विकासासाठी लागतो, तसेच कापसामध्ये परागीकरणासाठी, फळधारणेसाठी व धाग्याच्या उत्तम प्रतिसाठी आवश्यक आहे. बोरॉनमुळे कापूस पिकात नत्राचा व पालाशचा वापर चांगल्याप्रकारे होतो. नत्र आणि कार्बोहायड्रेट्स पानापासून बोंडांकडे नेण्यास मदत होते. बोरॉनमुळे मिश्र कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने पचण्यास तसेच कॅल्शिअम उचलण्यास व नेण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे बोंड गळत नाही आणि वजन सुद्धा वाढते. बागायती कापसापेक्षा जिरायत कापसामध्ये या अवस्थेत बोरॉन कमतरता दिसते त्यामुळे बोंडांचे अपेक्षित वजन व धाग्याची प्रत मिळत नाही. योग्य अवस्थेत बोरॉनची मात्रा कापूस पिकाला गेल्यास दर्जेदार धागा व उत्पन्न मिळते.

माहिती शेअर करा