कपाशीचा धागा कसा वाढेल?

कापूस पिकाला बोरॉन सर्व वाढीच्या अवस्थेत लागतो परंतु जास्त प्रमाणात हा बोंड विकासासाठी लागतो, तसेच कापसामध्ये परागीकरणासाठी, फळधारणेसाठी व धाग्याच्या उत्तम प्रतिसाठी आवश्यक आहे. बोरॉनमुळे कापूस पिकात नत्राचा व पालाशचा वापर चांगल्याप्रकारे होतो. नत्र आणि कार्बोहायड्रेट्स पानापासून बोंडांकडे नेण्यास मदत होते. बोरॉनमुळे मिश्र कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने पचण्यास तसेच कॅल्शिअम उचलण्यास व नेण्यास सुद्धा मदत होते. […]

कणसामध्ये दाणे चांगले कसे भरतील?

झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य एन्झाईम्सना चालना देते, त्यामुळे त्याची मदत प्रथिने निर्मितीसाठी होते. झिंक क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेट्स निर्मितीसाठी गरजेचे आहे, झिंकच्या पुरेशा पुरवठ्याने पराग कणांच्या दर्जामध्ये व काही अंशी त्यांच्या आयुष्यमानात वाढ होते. दर्जेदार पराग कणांनी बीजधारणा चांगली होते व कणीस भरण्यास मदत होते. पालाश हा घटक प्रकाश संश्लेषण क्रिया आणि अन्न निर्मितीत सहभाग घेतो. […]

द्राक्षबागेमध्ये एकसारख्या फुटींसाठी काय करावे ?

खरडछाटणी झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी द्राक्षबागेत फुटी निघायला सुरवात होतांना दिसून येते. या काळामध्ये द्राक्षबागेत अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. कारण काडीची शाखीय वाढ, घडनिर्मीती व वेली मधील होणारा अन्नसाठा हे सर्व घटक एक सारख्या फुटींसाठी आवश्यक आहेत. १) पाणी व्यवस्थापन : सुरूवातीच्या ३० ते ३५ दिवसात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी, […]

मालाचे वजन व चव वाढवण्यासाठी काय करावे?

पालाश हा पिकाच्या पेशीमध्ये पाणी, अन्नद्रव्ये आणि कार्बोहायड्रेटस वहनासाठी गरजेचा आहे. एन्झाईमना चालना देण्यासाठी, पालाश महत्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रथिने, स्टार्च आणि एटीपी निर्मिती होते. एटीपी निर्मितीमुळे प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो. पालाशमुळे पर्णरंध्रांची उघडझाप सुद्धा नियंत्रित होते कि ज्यामुळे पिकाच्या पानातील पाण्याची वाफ, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड अदलाबदल `करण्यास चालना मिळते.पिकातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यास आणि काही […]

मुळांच्या सुदृढ वाढीसाठी काय करावे ?

पांढरी मुळी ही झाडाचा आत्मा आहे ज्यामुळे सर्व अन्नद्रव्य पिकामध्ये शोषली जातात. झाडाची पांढरी मुळी ही पाणी व अन्नद्रव्य शोषण करते. अति प्रमाणात पाणी झाल्याससुद्धा मुळी बंद होते.किंवा मुळकुज होते. जर झाडाची मुळी सुरु नसेल तर त्याची वाढ खुंटते, फुलगळ होते, रोग, कीड, विषाणूस बळी पडते, फळांचा आकार व झाडांचा विकास होत नाही. प्रत्येक २५ […]

विषाणूजन्य रोगांपासून बचाव

आपल्याला माहित आहे की विषाणू पसरविण्याचे काम पिकामध्ये वेक्टर्स म्हणजे रोगवाहक करतात. पिकामध्ये अफिडस् २७५ प्रकारचे, पाढरीमाशी ४५ प्रकारचे, थ्रिप्स १० प्रकारचे विषाणू पसरवितात. म्हणून सर्वप्रथम विषाणूंचा प्रसार करणारे किटक यांच्या विरुध्द पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण क़रण्यासाठी कॅलोस सिन्थेसिसची क्रिया जागृत करणे गरजेचे असते. त्यासाठी पिकाला कॅल्शियमची ग़रज असते. कॅल्शियमच्या फवारणीने पिकातील कॅलोस सिन्थेसिसची क्रिया २१ […]

विषाणूजन्य रोगांविरुद्ध पिकामध्ये प्रतिकारशक्ती कशी वाढवता येते?

पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रसार रसशोषक किडींमार्फत होत असतो, त्यांनाच व्हेक्टर्स म्हटले जाते. पिकामध्ये अफिडस्( मावा )२७५ प्रकारचे, पांढरीमाशी ४५ प्रकारचे, थ्रिप्स १० प्रकारच्या विषाणूंचा प्रसार करतात. म्हणून सर्वप्रथम विषाणूंचा प्रसार करणाऱ्या किटकांविरूद्ध पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण क़रण्यासाठी कॅलोस सिन्थेसिसची क्रिया जागृत करणे गरजेचे असते. त्यासाठी पिकाला कॅल्शियमची ग़रज असते. कॅल्शियमच्या फवारणीने पिकातील कॅलोस सिन्थेसिसची क्रिया २१ […]

शोभेच्या झाडांना अधिक फुले येण्यासाठी काय करावे?

शाखीय वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी नत्र व स्फुरदची गरज असते. नत्राचा वापर ॲमिनो ॲसिड व प्रथिनांच्या संश्लेषणासाठी लागणारे बिल्डिंगब्लॅाक तयार करण्यासाठी केला जातो. तसेच न्युक्लिक ॲसिड, हरितद्रव्य व एन्झाईम निर्मितीसाठी नत्र गरजेचे असते. स्फुरद वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असणारा आहार आहे. स्फुरद वनस्पतींमधील विविध प्रकारच्या क्रियांमध्ये सहभागी असतो जसे की, प्रकाशसंश्लेषण, वनस्पती श्वसन, मुळांच्या निर्मितीसाठी, फुलांच्या […]

हानिकारक रसायनांशिवाय बुरशीजन्य रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवता येते का ?

सध्याच्या काळात पिकावर कुठलाही रोग आल्यास लगेच रासायनिक औषधांचा वापर केला जातो, खरेतर प्रत्येक पिकामध्ये निसर्गतः रोंगाशी लढण्याची क्षमता असते. पिकमधील एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता पिकाची रोगप्रतिकारक्षमता कमी करू शकते, कारण रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांमध्ये विशिष्ट प्रकारच्या रसायनांची निर्मिती होत असते त्यांना दुय्यम मेटाबोलाइटस् म्हणतात. यासाठी लोह, मॅगनीज, जस्त, तांबे व बोरॅान या सुक्ष्मअन्नद्रव्यांची […]

सोयाबीनच्या मुळावरील गाठी कशाने वाढतील?

मॉलिब्डेनम हे कडधान्य पिकात महत्वाचा घटक आहे. मॉलिब्डेनममुळे नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटमध्ये व त्यानंतर अमोनियामध्ये केले जाते. यामुळे झाडामध्ये नत्र पचण्यास मदत होते व त्यामुळे ॲमिनो आल्म व प्रथिने निर्मितीस वेग येतो. प्रथिने निर्मिती, सल्फर पचवण्यासाठी, परागीकण निर्मितीसाठी मॉलिब्डेनम लागते. मॉलिब्डेनम हा फ़्लोएम व झायलेम मधून वाहणारा घटक आहे. जमिनीत मॉलिब्डेनम कमतरता असेल तर कडधान्य पिकात […]