केळीची लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
केळी पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी (भारतीय परिस्थितीत) १. अत्यंत मोठी पानांची रचना: हाताने फवारणी करताना पानांच्या वरच्या व खालच्या दोन्ही बाजूंवर समान औषध पोहोचत नाही. २. उंच झाडे व दाट लागवड: ट्रॅक्टरद्वारे फवारणी केल्यास झाडांचे नुकसान होते व कॅनोपी बंद झाल्यानंतर फवारणी करणे अशक्य होते. ३. रोगांचा जास्त प्रादुर्भाव: सिगॅटोका लीफ स्पॉट, पनामा विल्ट तसेच किडींच्या प्रादुर्भावासाठी वारंवार फवारणी आवश्यक असते. ४. अन्नद्रव्यांची वारंवार फवारणी: सूक्ष्मअन्नद्रव्ये व वाढ नियंत्रकांची अनेक वेळा फवारणी केल्यामुळे मजुरी खर्च वाढतो. केळी पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था: फुलोरा सुरू होण्यापासून → घड विकासापर्यंतचा कालावधी केळी पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये:-मुख्य अन्नद्रव्य: पालाश महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
केळी पिकात पालाश व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. फुलोरा व फळधारणा वाढ २. फळांचा आकार, वजन व गोडी वाढवतात ३. घड भर घनदाट होण्यास मदत करतात व साठवण क्षमता (शेल्फ लाईफ) सुधारतात केळी पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. मोठ्या केळी पानांवर समान व अचूक फवारणी २. ड्रोनच्या डाऊनड्राफ्टमुळे दाट लागवडीत खोलवर प्रभावी प्रवेश ३. शेतात प्रवेश न करता फवारणी – पिकांचे नुकसान नाही ४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. लागवड व अंकुरण अवस्था : नत्र, स्फुरद, कॅल्शियम , जस्त
२. शाखीय वाढ अवस्था : नत्र , पालाश, मॅग्नेशियम, जस्त
३. कळी येण्याची अवस्था⭐: नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह
४. फुलोरा व परागीभवन अवस्था⭐: पालाश, स्फुरद , बोरॉन, जस्त
५. फळधारणा आणि विकास अवस्था ⭐: पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन
६. परिपक्वता व काढणी अवस्था ⭐: पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक