हळद लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
हळदीचे जास्त उत्पादन आणि गुणवत्ता मिळवा अचूक वनस्पती पोषणासह
हळद पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी
१. दाट व उंच पानरचना: ६०–७० दिवसांनंतर हाताने फवारणी करताना आतील पानांपर्यंत द्रावण समान पोहोचत नाही.
२. मल्च व उंच वाफ्यांवर लागवड: शेतात हालचाल केल्यास मल्च व मातीची रचना बिघडते.
३. रोगांचा जास्त प्रादुर्भाव: पानांवरील डाग, लीफ ब्लॉच व गड्डा कुज (रायझोम रॉट) यांसाठी प्रतिबंधात्मक फवारणी आवश्यक.
हळद पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : कंद विकास →कंद भरणी ⭐
हळद पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य: पालाश, महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: झिंक
हळद पिकात पालाश व झिंक का महत्त्वाचे आहेत?
१. कंदाची भरणी व वजन वाढीस थेट कारणीभूत
२. कर्क्युमिन प्रमाण, रंग व सुगंध सुधारतात
३. फुटव्यांची संख्या व अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढवतात
४. कंदाचा एकूण आकार व गुणवत्ता सुधारतात
हळद पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात?
१. दाट हळद पिकातही समान व अचूक फवारणी
२. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे आतील भागात उत्तम प्रवेश
३. मल्च किंवा उंच वाफ्यांना कोणताही त्रास न होता फवारणी
४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत
५. ८०–९०% पाण्याची बचत
६. जलद ॲापरेशन
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था :नत्र, स्फुरद, गंधक, जस्त
२. शाखीय वाढ अवस्था :नत्र , पालाश, मॅग्नेशियम, जस्त
३. फुटवा अवस्था :नत्र , पालाश, गंधक
४. कंद निर्मिती अवस्था⭐:नत्र , पालाश, जस्त, बोरॉन
५. कंद विकास अवस्था:पालाश, मॅग्नेशियम, जस्त, बोरॉन
६. कंद परिपक्वता अवस्था :पालाश, मॅग्नेशियम
Back