डाळिंब लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
डाळिंब पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. काटेरी व दाट पर्णसंभार: काटे व दाट पर्णसंभारमुळे हाताने फवारणी करणे कठीण होते तसेच आतील भागात फवारणी समान होत नाही. २. बहारी व्यवस्थापन (बहार नियंत्रण): ताण अवस्था, फुलोरा व फळधारणा काळात अचूक व वेळेवर फवारणी आवश्यक असते. ३. कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव: थ्रिप्स, मावा, फळ पोखरणारी अळी, जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल ब्लाइट) यासाठी वारंवार फवारणी करावी लागते. डाळिंब पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : फुलोरा → फळविकास अवस्था ⭐ डाळिंब पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये :-मुख्य अन्नद्रव्य: पालाश,दुय्यम अन्नद्रव्य: कॅल्शियम,महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
डाळिंब पिकात पालाश, कॅल्शियम व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. फुलधारणा व फळधारणा सुधारतात २. फळांचा आकार, रंग व एकसमान पक्वता वाढवतात ३. फळांची घट्टपणा व साठवण क्षमता (शेल्फ लाईफ) सुधारतात ४. फळे फुटणे (क्रॅकिंग) टाळण्यास मदत करतात ५. फुले व फळगळ कमी करतात डाळिंब पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. झाडाच्या दाट पर्णसंभारच्या सर्व बाजूंवर समान फवारणी २. ड्रोनच्या डाऊनड्राफ्टमुळे दाट व काटेरी छत्रीमध्ये खोलवर प्रवेश ३. पिकाशी प्रत्यक्ष संपर्क न झाल्याने मजुरांसाठी सुरक्षित ४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, कॅल्शियम, जस्त
२. मूळ वाढ अवस्था : स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम
३. शाखीय वाढ अवस्था : नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह
४. कळी अवस्था : स्फुरद, पालाश, बोरॉन, जस्त
५. फुलोरा अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, गंधक, बोरॉन
६. फळ धरणे अवस्था : ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन
७. फळ वाढ / विकास अवस्था : पालाश, नत्र, गंधक
८. परिपक्वता व काढणी अवस्था : पालाश, कॅल्शियम