पेरू लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
पेरू: जास्त उत्पादन आणि उच्च दर्जाचे फळ मिळवा अचूक वनस्पती पोषणासह
पेरू पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी
१. दाट व पसरट कॅनोपी: हाताने फवारणी करताना झाडांच्या आतील फांद्यांपर्यंत औषध समानपणे पोहोचत नाही.
२. अनेक बहार व्यवस्थापन:फुलोरा, फळधारणा व सुरुवातीच्या फळवाढीच्या टप्प्यावर अचूक अन्नद्रव्ये व संरक्षण फवारणी आवश्यक असते.
३. किड व रोगांचा तीव्र प्रादुर्भाव: फळमाशी, मेलीबग, खवले कीड, अँथ्रॅक्नोज यांसाठी वारंवार फवारणी करावी लागते.
पेरू पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : ⭐ फुलोरा → फळधारणा व सुरुवातीची फळविकास
पेरू पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य: पालाश महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
पेरू पिकात पालाश व बोरॉन का महत्त्वाचे आहेत?
१. फळांचा आकार, गोडी व रंग सुधारतात
२. फळगळ कमी करून साठवण क्षमता (Keeping Quality) वाढवतात
३ .फुलोरा, परागणक्षमता (Pollen Viability) व फळधारणा सुधारण्यास मदत करतात
पेरू पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात?
१. झाडांच्या वरच्या व आतील कॅनोपीवर समान फवारणी
२. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे दाट कॅनोपीत खोलवर प्रवेश
३. काटेरी फांद्यांशी थेट संपर्क नाही – मजुरांसाठी सुरक्षित
४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत
५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. लागवड अवस्था :नत्र , स्फुरद, कॅल्शियम, जस्त
२. शाखीय वाढ अवस्था :नत्र , पालाश, मॅग्नेशियम, जस्त
३. कळी येण्याची अवस्था :स्फुरद , पालाश, बोरॉन, जस्त
४. फुलोरा अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, गंधक, बोरॉन
५. फळ धरणे अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन
६. फळ वाढ अवस्था⭐: पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक
७. फळ परिपक्वता अवस्था⭐:पालाश , कॅल्शियम
Back