टोमॅटो लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
टोमॅटो पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. कीड व रोगांचा तीव्र प्रादुर्भाव: फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी, पान कुरतडणारी अळी (लीफ मायनर), लवकर व उशिरा करपा यांसाठी वारंवार फवारणी आवश्यक. २. दाट फांद्या व पानरचना: हाताने फवारणी करताना फवारणी द्रावण आतील भागात व खालच्या पानांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. ३. ताणामुळे फुले व फळे गळणे: अयोग्य अन्नद्रव्ये व वाढ नियंत्रकांच्या वापरामुळे उत्पादनावर परिणाम होतो. टोमॅटो पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : फुलोरा → फळधारणा अवस्था ⭐ टोमॅटो पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये ,मुख्य अन्नद्रव्य: पालाश ,दुय्यम अन्नद्रव्य: कॅल्शियम,महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
टोमॅटो पिकात पालाश, कॅल्शियम व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. फुलधारणा व फळधारणा सुधारतात २. फळांचा आकार, रंग व एकसमान पक्वता वाढवतात ३. फळांची घट्टपणा व साठवण क्षमता (शेल्फ लाईफ) सुधारतात ४. ताण सहनशक्ती वाढवतात ५. फुले गळणे कमी करतात टोमॅटो पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. दाट टोमॅटो पिकावर समान व अचूक फवारणी २. ड्रोनच्या डाऊनड्राफ्टमुळे आतील पानरचनेत खोलवर प्रवेश ३. पीक नुकसान न होता व मानवाचा रसायनांशी संपर्क कमी ४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, कॅल्शियम, जस्त
२. मूळ वाढ अवस्था : स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम
३. शाखीय वाढ अवस्था : नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह
४. कळी अवस्था : स्फुरद, पालाश, बोरॉन, जस्त
५. फुलोरा अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, गंधक, बोरॉन
६. फळ धरणे अवस्था : ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन
७. फळ वाढ / विकास अवस्था : पालाश, नत्र, गंधक
८. परिपक्वता व काढणी अवस्था : पालाश, कॅल्शियम