कलिंगड लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
कलिंगड: जास्त उत्पादन आणि रसाळ, गोड फळ मिळवा अचूक वनस्पती पोषणासह
टरबूज पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी )
१. जमिनीवर पसरणारी वेल (Prostrate Growth):वेली जमिनीवर पसरल्यामुळे हाताने फवारणी करणे कठीण व असमान होते.
२. किड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव:फळमाशी, मावा, लाल कोळी तसेच भुरी (Powdery Mildew) यासाठी वारंवार फवारणी आवश्यक असते.
३. अन्नद्रव्यांची वारंवार फवारणी आवश्यक:दर्जेदार फळांसाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये व वाढ नियंत्रकांची पर्णफवारणी करावी लागते.
४. पाण्यास अतिसंवेदनशील पीक:फवारणीत जास्त पाणी वापरल्यास फुले व फळांचे नुकसान होऊ शकते.
टरबूज पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था :⭐फुलोरा → फळधारणा अवस्था
टरबूज पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये:-मुख्य अन्नद्रव्य: पालाश , महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
टरबूज पिकात पालाश व बोरॉन का महत्त्वाचे आहेत?
१. फळांचा आकार, वजन व योग्य आकारमान सुधारतात
२. गोडी वाढवतात (TSS / साखरेचे प्रमाण)
३. फुलांची मजबुती वाढवून फुलगळ कमी करतात
४. फळांचा रंग, चव व साठवण क्षमता (Shelf Life) सुधारतात
टरबूज पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात?
१. जमिनीवर पसरलेल्या वेलींवर समान व अचूक फवारणी
२. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे पानांपर्यंत व फुलांच्या गाठींपर्यंत प्रभावी प्रवेश
३. वेलींना किंवा फळांना कोणतेही शारीरिक नुकसान नाही
४. ६०–७०% मजुरी खर्चाची बचत
५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था :स्फुरद, नत्र, कॅल्शियम, जस्त
२.वेली वाढ / शाखीय वाढ अवस्था⭐:नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह, जस्त, मॅंगनीज
३.कळी येण्याची अवस्था⭐:स्फुरद, पालाश, बोरॉन, जस्त
४.फुलोरा अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, बोरॉन
५.फळधारणा अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, बोरॉन, जस्त
६.फळ वाढ अवस्था⭐:पालाश, मॅग्नेशियम, कॅल्शियम
७.फळ परिपक्वता / गोडी वाढीची अवस्था⭐: पालाश
Back