आले लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
आलेचे जास्त राईझोम उत्पादन आणि उच्च दर्जाची गुणवत्ता मिळवा अचूक वनस्पती पोषणासह
आले पिकातील फवारणीसंबंधी प्रमुख अडचणी
१. आच्छादन (मल्च) व सावलीखाली लागवड: मल्च व दाट पानरचनेमुळे पारंपरिक फवारणी योग्य प्रकारे आतपर्यंत पोहोचत नाही.
२. रोगांचा तीव्र प्रादुर्भाव: सॉफ्ट रॉट, राइझोम रॉट, पानांवरील डाग (लीफ स्पॉट) यांसाठी प्रतिबंधात्मक व वेळेवर फवारणी आवश्यक.
३. वारंवार फवारणीची गरज: पिकाचा कालावधी जास्त (७–८ महिने) असल्याने मजुरी व खर्च वाढतो.
आले पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : कंद(रायझोम) विकास
आले पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये : मुख्य अन्नद्रव्य: पालाश, महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: झिंक
आले पिकात पालाश व झिंक का महत्त्वाचे आहेत?
१. कंदाचा विकास व आकार वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे
२. वनस्पती वाढीसाठी आवश्यक एन्झाइम्स सक्रिय करतात
३. हरितद्रव्य (क्लोरोफिल) निर्मिती व प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक
४. फुटवे वाढ व अन्नद्रव्य शोषण क्षमता सुधारतात
आले पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात?
१. मल्च व सावलीखालील शेतातही समान फवारणी
२. ड्रोनच्या डाऊनड्राफ्टमुळे दाट पानांमधून उत्तम प्रवेश
३. मल्च किंवा मातीला कोणताही त्रास न होता फवारणी
४. ६०–७०% मजुरी खर्चाची बचत
५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र , स्फुरद, गंधक, जस्त
२. शाखीय वाढ अवस्था: नत्र, मॅग्नेशियम, जस्त, लोह
३. फुटवा अवस्था : नत्र, पालाश, मॅग्नेशियम, जस्त
४. कंद निर्मिती अवस्था⭐:पालाश, नत्र , जस्त, बोरॉन
५. कंद वाढ अवस्था⭐: पालाश, मॅग्नेशियम, जस्त, बोरॉन
६. कंद परिपक्वता अवस्था :पालाश, मॅग्नेशियम
Back