फुलकोबी लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
फुलकोबी पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. घट्ट व दाट गड्डा (Curd) निर्मिती:हाताने फवारणी करताना गड्ड्याच्या आतील भागांपर्यंत औषध पोहोचत नाही. २. किड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव:मावा, अळ्या, पांढरी माशी तसेच बुरशीजन्य रोगांमुळे वारंवार फवारणी करावी लागते. ३. पर्णअन्नद्रव्यांची वारंवार गरज:गड्ड्याचा दर्जा सुधारण्यासाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये, कॅल्शियम व वाढ नियंत्रक आवश्यक असतात. ४. नाजूक गड्डा :जास्त फवारणी किंवा थेट संपर्कामुळे गड्ड्याचे नुकसान होऊ शकते. फुलकोबी पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : ⭐गड्डा सुरू होण्यापासून → गड्डावाढीपर्यंत फुलकोबी पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्ये: नत्र, पालाश, महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
फुलकोबी पिकात नत्र, पालाश व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. पानांची जोमदार वाढ व गड्ड्या निर्मिती २. गड्ड्याचा आकार, घट्टपणा व वजन वाढ ३. टिप बर्न व तपकिरीपणा (Browning) टाळण्यास मदत ४. एकसारखी गड्डा निर्मिती फुलकोबी पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १. गड्डा व पानांवर समान व अचूक फवारणी २. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे गड्ड्याच्या आतील भागांपर्यंत चांगला प्रवेश ३. पिकांचे नुकसान न होता मानवी संपर्क कमी ४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था⭐:स्फुरद, नत्र, कॅल्शियम, बोरॉन, जस्त
२. प्रतिरोपण अवस्था⭐:स्फुरद, कॅल्शियम, जस्त, लोह
३. शाखीय पानांची वाढ अवस्था⭐:नत्र, पालाश, मॅग्नेशियम, बोरॉन, जस्त, लोह
४. गड्याची निर्मिती अवस्था ⭐:नत्र, पालाश, कॅल्शियम, बोरॉन, मोलिब्डेनम
५. गड्याची वाढ अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, मोलिब्डेनम
६. परिपक्वता अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम