मिरची लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
मिरची पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी १. किडींचा तीव्र प्रादुर्भाव: थ्रिप्स, कोळी (माइट्स), मावा, पांढरी माशी यामुळे मोठे नुकसान होते तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो. २. वारंवार फवारणीची गरज: एका हंगामात १०–१५ फवारण्या कराव्या लागल्याने खर्च व मजुरांवरील अवलंबित्व वाढते. ३. दाट फांद्या व पानरचना: हाताने फवारणी करताना फवारणी द्रावण आतील भागापर्यंत योग्यरीत्या पोहोचत नाही. ४. ताणामुळे फुले व फळे गळणे: अयोग्य अन्नद्रव्य व वाढ नियंत्रकांच्या वापरामुळे उत्पादन घटते. मिरची पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : फुलोरा → फळधारणा अवस्था⭐ मिरची पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य: पालाश ,दुम अन्नद्रव्य: कॅल्शियम महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
मिरची पिकात पालाश, कॅल्शियम व बोरॉन का महत्त्वाचे आहेत? १. फुलधारणा व फळधारणा सुधारतात २. फुले गळणे रोखण्यास मदत करतात ३. पानांची वाढ व आकार सुधारतात ४. एकूण उत्पादन व फळांची गुणवत्ता वाढवतात मिरची पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात? १.दाट मिरची पिकावर समान व अचूक फवारणी २. ड्रोनच्या डाऊनड्राफ्टमुळे आतील भागात उत्तम प्रवेश ३. पीक नुकसान न होता व मानवाचा रसायनांशी संपर्क टाळून फवारणी ४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत ५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, कॅल्शियम, जस्त
२. मूळ वाढ अवस्था : स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम
३. शाखीय वाढ अवस्था : नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह
४. कळी अवस्था : स्फुरद, पालाश, बोरॉन, जस्त
५. फुलोरा अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, गंधक, बोरॉन
६. फळ धरणे अवस्था : ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन
७. फळ वाढ / विकास अवस्था : पालाश, नत्र, गंधक
८. परिपक्वता व काढणी अवस्था : पालाश, कॅल्शियम