काकडी लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
भारतातील परिस्थितीत काकडी पिकासाठी फवारणीतील विशेष अडचणी १. जमिनीवर पसरलेल्या वेलींमुळे: हाताने फवारणी करताना फवारणी समान होत नाही व मजुरी जास्त लागते. २. कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव: लाल कोळी, मावा, भुरी व करपा यासाठी वारंवार फवारणी आवश्यक असते. ३. पानेद्वारे अन्नद्रव्यांची गरज: फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये, पोटॅशियम व वाढ नियामकांची फवारणी आवश्यक असते. ४. पाणी-संवेदनशील पीक: जास्त पाण्याची फवारणी केल्यास फुले व कोवळी फळे गळण्याचा धोका असतो. काकडी पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : फुलोरा → फळधारणा काकडी पिकासाठी अत्यावश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य: पालाश, दुय्यम अन्नद्रव्य: कॅल्शियम ,सूक्ष्म अन्नद्रव्य: बोरॉन
काकडीसाठी पालाश, कॅल्शियम व बोरॉन का अत्यंत महत्त्वाचे आहेत? १. फळांची लांबी, जाडी व वजन वाढवतात. २. फळांचा चवदारपणा व एकसारखा हिरवा रंग सुधारतात. ३. फुलगळ व फळगळ कमी करतात. ४. वेलींना मजबुती व ताण सहनशीलता देतात. ५. फळांची टिकवण क्षमता व वाहतूक क्षमता वाढवतात. काकडी पिकात ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे १. जमिनीवर पसरलेल्या वेलींवर समान व अचूक फवारणी होते. २. ड्रोनच्या डाउनड्राफ्टमुळे पानांमध्ये व फुलांच्या गाठीपर्यंत उत्तम प्रवेश मिळतो. ३. पिकाला किंवा फळांना कोणतीही शारीरिक हानी होत नाही. ४. ६०–७०% मजुरी खर्चाची बचत होते. ५. ८०–९०% पाण्याची बचत होते, त्यामुळे पिकावर ताण येत नाही.
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था⭐:स्फुरद, नत्र, कॅल्शियम, जस्त
२. शाखीय / वेली वाढ अवस्था⭐:नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह, जस्त, मॅंगनीज
३. फुल निर्मिती अवस्था⭐:स्फुरद, पालाश, बोरॉन, जस्त
४. फळ धारणा अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम, बोरॉन, जस्त
५. फळ वाढ अवस्था⭐:पालाश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह
६. फळ परिपक्वता अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम