पपई लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
पपई: जास्त उत्पादन आणि उच्च दर्जाचे फळ मिळवा अचूक वनस्पती पोषणासह
पपई पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी
१. उंच व मऊ खोडाची झाडे: हाताने फवारणी करताना झाडे व पाने सहज तुटण्याची शक्यता असते.
२. किड व रोगांचा तीव्र प्रादुर्भाव: पपई मेलीबग, फळमाशी, मावा, कोळी तसेच अँथ्रॅक्नोज रोगासाठी वारंवार फवारणी आवश्यक असते.
३. अनेक हंगामात फुलोरा व फळधारणा: सतत फुलोरा व फळधारणा होत असल्यामुळे योग्य वेळी अन्नद्रव्ये व कीटकनाशकांची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
पपई पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : ⭐ फुलोरा → फळधारणा व सुरुवातीची फळविकास
पपई पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये :-मुख्य अन्नद्रव्य: पालाश,महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: बोरॉन
पपई पिकात पालाश व बोरॉन का महत्त्वाचे आहेत?
१. फळांचा आकार, गोडी व रंग सुधारतात
२. फळगळ कमी करून साठवण क्षमता (Keeping Quality) वाढवतात
३. फुलोरा, परागणक्षमता (Pollen Viability) व फळधारणा सुधारण्यास मदत करतात
पपई पिकात फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात?
१.झाडांना नुकसान न करता कॅनोपीवर समान फवारणी
२. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे आतील पानांपर्यंत प्रभावी प्रवेश
३. रसायनांशी मानवी थेट संपर्क नाही – अधिक सुरक्षित फवारणी
४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत
५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. रोप अवस्था : नत्र, स्फुरद, कॅल्शियम, जस्त
२. शाखीय वाढ अवस्था: नत्र, पालाश, मॅग्नेशियम, जस्त
३. सक्रिय शाखीय वाढ अवस्था ⭐: नत्र , पालाश, मॅग्नेशियम, लोह
४. कळी येण्याची अवस्था:स्फुरद, पालाश, बोरॉन , जस्त
५. फुलोरा अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, गंधक, बोरॉन
६. फळधारणा अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन
७. फळ वाढ अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक
८. फळ परिपक्वता अवस्था⭐:पालाश, कॅल्शियम
Back