पांढरी मुळी ही झाडाचा आत्मा आहे ज्यामुळे सर्व अन्नद्रव्य पिकामध्ये शोषली जातात. झाडाची पांढरी मुळी ही पाणी व अन्नद्रव्य शोषण करते. अति प्रमाणात पाणी झाल्याससुद्धा मुळी बंद होते.किंवा मुळकुज होते. जर झाडाची मुळी सुरु नसेल तर त्याची वाढ खुंटते, फुलगळ होते, रोग, कीड, विषाणूस बळी पडते, फळांचा आकार व झाडांचा विकास होत नाही. प्रत्येक २५ तो २८ दिवसांनी पांढऱ्यामुळीचे सोटमुळात रूपांतर होते. त्यामुळे आपल्याला दर एक महिन्यांनी पांढऱ्या मुळीसाठी चांगल्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड व ॲमिनो ॲसिड देणे आवश्यक आहे. फ्री अमिनो ॲसिडमुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ सरळ होते व ताणग्रस्थ परिस्थितीतून पिकाला वाचवतात, मुळ्यांची संख्या, लांबी व आयुष्यमान वाढते. अन्नग्रहण करण्याची कार्यक्षमता ही वाढते. चांगल्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड वापरल्यामुळे आपल्यापिकामध्ये पांढऱ्या मुळांची भरघोस वाढ होते, जमिनीचा पोत सुधारतो, तसेच स्फुरद व पालाश या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविते.