राज्यात ८०% द्राक्षांची फळछाटणी आटोपली

राज्यात द्राक्षांची फळछाटणीला गती आली असून, आजअखेर सुमारे ८०% द्राक्षांची फळछाटणी आटोपली आहे. येत्या पंधरवड्यात फळछाटणी संपेल संख्या द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलाचा फटका बागेला बसल्याने काही अंशी डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.द्राक्ष संघाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात […]

नाशिकच्या पूर्वहंगामी द्राक्षांची रशियाला निर्यात

नाशिक जिल्ह्यात कसमादे भागात द्राक्ष उत्पादक गेल्या दोन दशकांपासून जोखीम घेऊन पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेत आहेत. यंदाच्या हंगामात द्राक्षमालाचे खुडे मागील सप्ताहात सुरु झाले. त्यास प्रतिकिलो १२० ते १३० रुपये दरम्यान दर मिळाला. काढणीपश्चात या द्राक्षांची निर्यात सुरु झाली असून पहिले दोन कंटेनर रशियासाठी रवाना झाले आहेत.दक्षिण आशियायी देशांमध्ये सर्वात पहिल्यांदा गोडी बहार फळ छाटणी […]

सांगली जिल्हात फळछाटणी अंतिम टप्यात, धुक्यांमुळे पिकांना फटका

सांगली जिल्हात सततचा पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागांची फळछाटणी लांबली आहे. फळछाटणी हंगाम अंतिम टप्यात सुरु आहेत. केवळ १० -१५ टक्के क्षेत्राची छाटणी शिल्लक राहिल्या आहेत. बागेत काम करण्यासाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांकडे विनंती करून बोलवण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी शेतकऱ्यांना धुक्याशी सामना करावा लागत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

प्रतिकूल परिस्थितीतहि निर्यातीसाठी द्राक्ष बागांची नोंदणी

यंदा अति पाऊस, परतीचा पाऊस याचा फटका राज्यातील द्राक्षाला बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतहि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बाग साधल्या आहेत. यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पुढे आले असून, राज्यात आजअखेर १ हजार ४८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे ,अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली […]

‘एआय’ द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

जगभर कृषी तंत्रज्ञानामध्ये जलद गतीने बदल होत आहेत. हवामान बदल लोकसंख्येची वाढ आणि संसाधनाची कमतरता यासारख्या जागतिक आव्हानामुळे नवकल्पनांसह नवनवी कृषितंत्रे आवश्यक होत आहेत. जगभर जसजशी उद्योग व्यवस्था बदलते आहे तशीच शेती क्षेत्रातही स्थितंत्रे घडून येताहेत, ही निश्चितपणे जमेची बाजू आहे.अर्थात काटेकोर शेती – पाण्याचे व्यवस्थापन, पीकबदल, पोषण व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात नियोजन आणि शेतीमाल […]

पुणे जिल्ह्यात ५६ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या

पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम महत्त्वाचा मानला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरीप हंगामामध्ये ५० टक्के उत्पादनात घट आली होती. ‘‘परतीचा पाऊस थांबल्याने आता जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरण्यांना वेग घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करावे लागले होते. मात्र यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार […]

ऊसाला 3700 रुपयांची FRP ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई, 23 व्या ऊस परिषदेतील 9 महत्वाच्या मागण्या

चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन ऊसाला 3700 रुपयांची  एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दिवाळीपुर्वी तातडीने 200 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, असेही शेट्टी म्हणाले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23 वी ऊस परिषद जयसिंगपूरमध्ये पार पडली. या परिषदेत 9 महत्वाचे ठराव करण्यात […]

Keli Pik Vima 2024 : केळी पिकासाठी विमा योजनेत कशी मिळते नुकसान भरपाई

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने […]

फळ पीकविमा योजनेतील सहभाग अल्प

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागासंबंधीची कार्यवाही १ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. ३१ पर्यंत या योजनेत केळीसह अन्य फळ पिकांसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. परंतु विमा योजनेसंबंधीचे पोर्टल तब्बल सात ते आठ दिवस बंद होते. यामुळे अनेक केळी उत्पादक योजनेत सह्भाग घेऊ शकले नाहीत. खानदेशात फळ पीकविमा योजनेत केळी उत्पादक अधिकच सह्भाग घेतात. यंदा […]

मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण प्रसारित

केंद्रीय बियाणे अधिनियम,१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणांचा समावेश भारताच्या राज्यपत्रात करण्यात आला.याबाबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून राजपत्राचा नोंदणी क्रमांक एस ओ ४३८८(अ) असा आहे. सादर पाच वाणात विद्यापीठ विकसित देशी कापसाचा पीए ८३३ व […]