नगरमध्ये कांद्याला ४७००, तर राहुरीमध्ये ४८०० रुपयापर्यंत दर

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याला ५०० ते ३६०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला २५०० ते ४६०० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हा दर ५२०० रुपयापर्यंत होता. अधिक माहितीसाठी क्लिक करा

ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे लक्ष देतात केवळ युरोपच नव्हे तर भारतात सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार द्राक्षाची गुणवत्ता असल्यास फायदा होऊ शकतो. यासह काढणीपश्चात शीतकरण, साठवणूक व विपणन काळाची गरज आहे, असा सूर मान्यवर व तज्ज्ञांच्या भाषणातून समोर आला. अधिक माहितीसाठी क्लिक करा

राज्यात द्राक्षाच्या आगाप फळछाटणीला पावसाचा फटका

राज्यात द्राक्षाची आगाप फळछाटणी आटोपली आहे. आगाप फळछाटणी १५ टक्के म्हणजे सुमारे सुमारे ६५ हजार एकरांवर झाली आहे. सद्यस्थितीला गोळी घड, पोंगा आणि फुलोरावस्थेत या विविध टप्यावर बागा आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसाचा फटका या बागांना बसला आहे. परिणामी, पाच टक्के गोळी घड जिरण्याची समस्या उदभवू लागली असल्याने द्राक्ष शेतकरी अडचणीत आला आहे. अधिक माहितीसाठी […]

केळी लागवड वाढण्याचे संकेत

खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत लागवड केलेल्या केळीस यंदा व मागील दोन हंगामातही चांगले दर मिळाले आहेत यामुळे या कालावधीत केळीची लागवड वाढण्याचे संकेत आहेत.खानदेशात अलिकडे बारमाही केळी लागवड केळी जाते. परंतु प्रमुख दोन बहरात केळी पिकाची लागवड करण्याचा प्रघातही खानदेशात […]

परळीजवळ सीताफळ तर मालेगाव जवळ स्थापित होणार डाळिंब इस्टेट;

बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल येथे २९.५० हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेटला, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे ५.७८ हेक्टर स्थापन करण्यास सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अधिक माहितीसाठी क्लिक करा

सततच्या पावसाने छाटणीचे वेळापत्रक कोलमडले ! ऑक्टोबरमध्ये द्राक्षबागांचा पोळा फुटणार; उशिरामुळे दरावर परिणाम होण्याची शक्यता

कसबे सुकणे: निफाड तालुक्यातील आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरु असून या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचल्याने चिखलामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या द्राक्षबागांच्या छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. पाऊस उघडल्यानंतर द्राक्षबागा छाटण्याचा पोळा ऑक्टोबरमध्ये एकदम फुटेल अशी शक्यता द्राक्ष बागायतदार शेतकरी तसेच तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्वाचे

महाराष्ट्रात आज बहुतांशी गावात उच्चशिक्षित युवा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत. गेल्या काही वर्षात ग्रामसभा अधिकाधिक बळकट होत असून, ग्रामविकासामध्ये नवनवीन कल्पना मांडून अंबलबजावणीसाठी प्रयत्नही सुरु आहेत. गेल्या दिड दशकापासून केंद्र सरकारचा निधी थेट गावात पोहचत आहे त्याला जोड मिळत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल

एकीकडे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत पावणे पाच लाख टन कांदा खरेदी केला. हा बफर साठा टप्याटप्याने देशाच्या विविध बाजारांत पाठवला जात आहे. मात्र अशातच अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल झाला आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आयात नगण्य आहे. तर भारतीय कांद्याच्या स्पर्धेत गुणवत्ता व प्रतवारी नसल्याने ग्राहकांची कमी असल्याचे समोर आले आहे. अधिक […]

द्राक्ष पिकातील छाटणीपूर्व व काडीची वाढ अवस्था दरम्यान कसे कराल व्यवस्थापन

द्राक्ष पिकात ऑक्टोबरमध्ये छाटणीचे नियोजन करत असाल तर द्राक्षबागेत काय काम करणे आवश्यक आहे.छाटणीपूर्व अवस्था -फळ छाटणीचा हंगाम 1. ऑक्टोबरमध्ये छाटणीचे नियोजन केले असल्यास, हिरवळीच्या खतासाठी सनहेम्प किंवा धेंचा वाढवा. अधिक माहितीसाठी क्लिक करा

देशातील फलोत्पदान उत्पादनात 0.६५ टक्के घट

देशातील २०२३-२४ यावर्षासाठीचे फलोत्पदान उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टन (0.६५ )घट होण्याची शक्यता आहे.मात्र एकूण उत्पादनात घट झाली असली, तरी फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती यासारख्या प्रमुख बागायती क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली […]