Hydroponics Farming : मातीविना कमी जागेत करता येते या नवीन तंत्राने शेती

हायड्रोपोनिक्स शेती ही मातीविना केली जाते आणि या प्रकारच्या शेतीमध्ये मातीची गरज नाही. या तंत्रज्ञानामध्ये पिकांची लागवड आणि कापणी थेट पाण्याच्या प्रवाहात केली जाते.हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये पाइपद्वारे शेती केली जाते, ज्यामध्ये वरच्या बाजूने छिद्र केली जातात आणि त्याच छिद्रांमध्ये झाडे लावली जातात. भारतातील हायड्रोपोनिक्स शेती अद्याप बाल्यावस्थेत असतानाही त्यात वाढ दिसत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

केंद्र सरकारची ‘कृषी सप्तसूत्री’, मोठ्या योजनांचा असा होणार फायदा

केंद्र सरकारने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह सात मोठ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने या योजनांसाठी १४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. सन २०४७ पर्यंत देशातील कृषी विकास, अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षेची पूर्वतयारी करण्यासाठीची ही ‘कृषी सप्तसूत्री’ […]

द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, विमासंरक्षण, नुकसान भरपाई अनुदानासाठी प्रयत्नशील : अजित पवार

राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या या केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून सोडवणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधीत यंत्रणांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल. अवेळी […]

AI In Agriculture : देशातील एआय तंत्रज्ञान शेतीला फायद्याचं आहे का?

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा डंका वाजतोय. कुणी म्हणतंय एआय जॉब हिसकावून घेणार. लोकांना बेरोजगार करणार. तर कुणी म्हणतंय एआय नवीन जॉब तयार करणार. जगासाठी नवीन क्षितिज खुली करणार. पण थांबा. या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी शेतकऱ्यांना आणि शेतीला त्याचा फायदा नेमका काय? असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं काय […]

अन्नद्रव्यांच्या उपलब्धीकरणाची क्रिया

अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कुजविणाऱ्या जिवाणूसुष्टीमुळे होते. हा जिवाणूंचा एक गट असतो. जमिनीतील दुसरा गट पिकाच्या गरजेनुसार मागणीनुसार अन्नद्रव्य स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात आणतो आणि ती पिकाला उपलब्ध होतात. अधिक माहितीसाठी क्लिक करा

बदलत्या हवामानानुसार द्राक्ष शेती करण्याची आवशक्यता : डॉ.सावंत

सध्याच्या स्थितीत वातावरणातील होणाऱ्या बदलला सामोरे जाण्यासाठी द्राक्ष बागायतदारांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून बदलत्या हवामानाला अनुरूप द्राक्ष शेती करण्याची आवशक्यता आहे, असे प्रतिपादन बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस. डी. सावंत यांनी केले. अधिक माहितीसाठी क्लिक करा

एकाच दिवशी मिळाले १३ आंतरराष्ट्रीय पेटंट

एकाच दिवशी एक – दोन नव्हे तर तब्बल १३ आंतरराष्ट्रीय पेटंटस मिळविण्याचा अनोखा विक्रम महाराष्ट्रातील संशोधकाच्या चमूने केला आहे. यामध्ये हळद संशोधनाशी संबंधित दहा तर सीएनजी संबंधित तीन पेटंटसचा समावेश आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये देखील या विक्रमाची नोंद होणार आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

शेतकऱ्यांना बिगर पेटंटेड द्राक्ष वाण देण्याचे उद्दिष्ट

राज्यातील द्राक्ष उत्पादक व शासनातील दुवा द्राक्ष संघ काम करेल. आमचे पहिले उद्दिष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत बिगर पेटंटेड द्राक्ष वाण पोहचवण्याचे राहील, असे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी क्लिक करा

जळगावच्या केळीचा इराणमध्ये डंका ! एक केळीचा घड ३५ किलोंचा, लाखोत कमवतोय हा शेतकरी ……

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फळभाग जपणं तस कठीण काम. बदलत्या हवामानात टिकाव धरत भरगोस उत्पन्न मिळवत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवण्याचं दिसतंय. अधिक माहितीसाठी क्लिक करा

रासायनिक खतांवरील खर्च कमी करून ”नॅनो खतांचा वापर वाढवा ”

देशात रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत ढासळत चालेला आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांनी नॅनो खतांचा वापर करावा, यासाठी आग्रही आहे. रासायनिक खतांवर अनुदानापोटी खर्च होणारे पैसे प्रत्येक राज्यांना इतर विकासकामासाठी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा