शाखीय वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी नत्र व स्फुरदची गरज असते. नत्राचा वापर ॲमिनो ॲसिड व प्रथिनांच्या संश्लेषणासाठी लागणारे बिल्डिंगब्लॅाक तयार करण्यासाठी केला जातो. तसेच न्युक्लिक ॲसिड, हरितद्रव्य व एन्झाईम निर्मितीसाठी नत्र गरजेचे असते. स्फुरद वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असणारा आहार आहे. स्फुरद वनस्पतींमधील विविध प्रकारच्या क्रियांमध्ये सहभागी असतो जसे की, प्रकाशसंश्लेषण, वनस्पती श्वसन, मुळांच्या निर्मितीसाठी, फुलांच्या निर्मितीसाठी व कळी निर्मितीसाठी. स्फुरदचा वापर झाडातील पेशींमध्ये प्रोटीन, फॅट्स व साखर यांच्या वहनासाठी केला जातो. स्फुरद हा ATP रेणुमधील महत्वाचा घटक आहे, त्यामुळेच त्याला उर्जा निर्मितीचा केंद्रीय घटक म्हणून ओळखले जाते. एकूण गरजेच्या ५०% स्फुरद फुलनिर्मितीच्या काळात वापरला जातो.
फ़ुलातील स्रीकेशर निर्मितीसाठी बोरॅान व पु्ंकेसर निर्मितीसाठी झिंक सर्वात महत्वाचा घटक आहे. वरील सर्व अन्नद्रव्ये असणाऱ्या उत्पादनाच्या वापराने शोभेच्या झाडांमध्ये अधिक फुले येतील.