उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; उत्तर भारतातील थंडीचा कडाकाही झाला कमी

मार्चच्या सुरुवातीला उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. देशात आणि राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात सकाळी गारवा जाणवत आहे. पण दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी […]

बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याने बेदाणा उत्पादन आणि निर्यातीत मोठी घट झाली असल्याचा मुद्दा समाधान अवताडे, रोहित पवार यांच्यासह इतर आमदारांनी विधानसभेत आज (ता.२७) उपस्थित केला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी चालू वर्षात बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटल्याचे सभागृहात सांगितले. उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मदत व उपाययोजनांसाठी सरकार […]

शेतकऱ्यांना कर्जमाफी नेमकी कधी?; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत महत्त्वाची माहिती

शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार केली असून त्याचा अहवाल अपेक्षित आहे. कर्जमाफीसंदर्भात आम्ही जे काही आश्वासन दिले आहे, ते आम्ही योग्यवेळी पूर्ण करु, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.२६ फेब्रुवारी) विधानसभेत केला. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. कर्जमाफी देत असताना बँका चुकीच्या पद्धतीची अकाऊंट देतात. जुने अकाऊंट काढून पैसे आपल्याकडून घेतात, […]

राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

केंद्र सरकारने देशात २३ लाख ७ हजार टन हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यापैकी राज्यात ७ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदी होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्येही खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. यंदा हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता.२४) रात्री विविध राज्यांचे […]

सेन्सर्स, जीपीएस, जीआयएस प्रणालीयुक्त ड्रोन

शेतजमिनीचे सूक्ष्म निरीक्षण, पिकांच्या आरोग्याचे परीक्षण, कीड व रोग नियंत्रण आणि अचूक फवारणीसाठी ड्रोनचा प्रभावी वापर केला जात आहे. ड्रोन म्हणजे मानवरहित विमान, ज्याला अनमॅन्ड एरियल व्हेइकल हे दूरनियंत्रण किंवा स्वयंचलित प्रणालीद्वारे चालवले जाते. ड्रोनवरील कॅमेरे आणि संवेदक पिकांची स्थिती अचूकपणे दर्शवितात, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक निर्णय घेणे शक्य होते. परिणामी, उत्पादन वाढते आणि खर्च कमी […]

वातावरणातील घटकांवर आधारित समीकरण पद्धतीची चिकित्सा

सिंचन नियोजनासाठी पिकांची पाण्याची गरज काढण्यासाठी वापरली जाणारी दुसरी सर्वांत महत्त्वाची पद्धत म्हणजेच हवामानातील घटकांचा वापर समीकरणांमध्ये करून पाण्याची गरज काढणे. पद्धतीमध्ये पिकांना लागणाऱ्या पाण्याची गरज ही मुख्यतः सभोवताली असणाऱ्या वातावरणावरच अवलंबून असल्याचे मानले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. या पद्धतीची अचूकता ही हवामानातील कोणकोणते घटक वापरण्यात येत आहेत आणि कोणते समीकरण वापरले जाणार […]

ॲग्रो व्होल्टाइक्स तंत्रज्ञानाचा वापर

सद्यःस्थितीत भारतामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढत असून, पर्यावरणाचा समतोल राखून पारंपारिक ऊर्जेला हा एक मोठा पर्याय ठरत आहे. महानिर्मिती सोबत करार करून शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत प्राप्त झाला आहे. म्हणूनच जर आपण सौर शेतीचा पर्याय निवडला तर दोन्ही गोष्टी साध्य करून घेता येणे आता शक्य आहे. सौर शेती म्हणजेच ॲग्रो व्होल्टाइक्स. हे एक असे […]

कारखाने आता वर्षभर चालणार

ऊस गाळप हंगामापुरते मर्यादित राहणारे साखर कारखाने आता वर्षभर कार्यरत ठेवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. मका व धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देणाऱ्या मल्टिफीड डिस्टिलरी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यानंतर देशभरातील ६३ साखर कारखान्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. उसाव्यतिरिक्त मका, बीट, तांदूळ, ज्वारी आदी धान्यांचा […]

वेचणी यंत्राचे स्वागत, पण…

केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, (सीआयएई) भोपाळ ने कापूस वेचणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र भारतीय बनावटीचे ट्रॅक्टरचलित, टु-रो कॉटन स्ट्रिपर हार्वेस्टर या प्रकारचे असल्याचे मत संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यासह देशभरातील इतरही काही संस्थांमध्ये यांत्रिक […]

पाच हजार टन भारतीय बासमतीची अमेरिकेतून ऑर्डर

भारत-अमेरिका व्यापार करारावरून जोरदार टीका होत असतानाच बासमती तांदूळ निर्यातीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका भारतीय निर्यातदाराने अमेरिकेतील एका खरेदीदाराला पाच हजार टन बासमती तांदळाचा पुरवठा करण्यासाठी व्यावसायिक करार केला आहे. हा निर्यातदार भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाचा (आयआरईएफ) सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे. भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम झाल्यानंतरची ही एक महत्त्वाची घडामोड आहे. या करारानुसार, […]