कृषिक्षेत्राला ‘एल निनो’च्या झळा; भारतीय रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवालात इशारा

२०२६-२७ या आर्थिक वर्षात देशाच्या कृषी क्षेत्राची कामगिरी प्रामुख्याने नैॡत्य मॉन्सूनच्या प्रगती आणि वितरणावर अवलंबून राहणार असून, संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे कृषी उत्पादनाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिला आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात (२०२५-२६) मध्ये म्हटले आहे, की हवामानाशी संबंधित जोखीम कायम असली, तरी सिंचन सुविधांमध्ये झालेली वाढ, […]
लिकिंगबाबत ‘एफआयए’च्या मागणीला ‘माफदा’चा विरोध

अनुदानित खतांसोबत बिगर अनुदानित खतांच्या विक्रीवर (लिंकिंग) लावलेली बंदी उठवावी, या ‘एफएआय’ने केलेल्या मागणीस ‘माफदा’ने कडाडून विरोध दर्शविला आहे.खत उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएआय) अलीकडेच लिंकिंगबंदीबाबत विरोधाची भूमिका मांडली होती. राज्य सरकारने लावलेल्या बंदीचा फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी ‘एफएआय’ने केली होती. त्यावर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) तातडीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे […]
दहा लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा

शेतकऱ्यांना ५० पैसे किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. यामुळे राज्यभरातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदा खरेदी प्रश्नी बुधवारी (दि. २७ मे) दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या महत्त्वाचा मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यात महत्त्वाचा म्हणजे […]
इंधनासह खत, परकीय चलनाबाबत सतर्क राहा: अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाने ‘३ एफ’ अर्थात इंधन (फ्युएल), खत (फर्टिलायझर) आणि परकीय चलन (फॉरिन एक्स्चेंज) यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, खतांचे चढे दर आणि परकीय चलनावरील दबाव यामुळे देशासमोर आर्थिक आव्हाने निर्माण होत असल्याचे त्यांनी […]
बेदाणा उद्योग संरक्षणासाठी कठोर धोरणाची मागणी

तुर्कस्तान, अफगाणिस्तान, अमेरिका तसेच चीनमधून वाढलेल्या बेदाणा आयातीमुळे भारतीय बेदाणा उद्योग अडचणीत सापडला असून बेकायदा आयातीचा थेट परिणाम स्थानिक बेदाण्याच्या दरावर होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने भारतीय बेदाणा उद्योगाच्या संरक्षणासाठी कठोर धोरण लागू करावे, अशी मागणी महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादकांकडून करण्यात येत आहे. भारत हा जगातील प्रमुख द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक देश असून महाराष्ट्रातील […]
बियाणे, खते, कीडनाशके खरेदी करताना काळजी घ्या: ‘माफदा’चे शेतकऱ्यांना आवाहन!

आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डिलर्स असोसिएशनच्या (माफदा) वतीने महासचिव विपिन कासलीवाल यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाण्याचे नाव, कंपनीचे नाव, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, किंमत, अंतिम मुदत तसेच विक्रेत्याची माहिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी […]
‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेसाठी २०८ कोटी, शेतकऱ्यांना किती मिळणार अनुदान?

पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)घटकासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २०८ कोटी १३ लाख ३३ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र आणि राज्य हिस्सा मिळून १६४ कोटी, अनुसूचित जाती २४.५५ कोटी, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १९.५७ कोटींच्या निधीचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय […]
शेडनेट हाउसमधील ठिबक सिंचन प्रणाली

ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाइपलाइन यामधील फिल्टर, व्हॉल्व्ह, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिगेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. कंट्रोल व्हॉल्व्ह हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर पाण्याचा दाब शेडनेटमधील उपलाइन किंवा लॅटरलच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल, तर बायपासद्वारे जास्तीचे पाणी पुन्हा विहिरीत किंवा स्रोताकडे वळवले जाते. यामुळे सिस्टिम फुटण्याचा धोका टळतो. शेडनेट […]
भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवर

भारताचा विकासदर २०२६मध्ये ६.४ टक्के राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. याआधी, विकासदर ६.६ टक्के राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र जागतिक अस्थिरता आणि पश्चिम आशियातील परिस्थिती निर्माण झालेल्या आर्थिक धक्क्यांमुळे या अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, विकासदरामध्ये घट होणार असली, तरीही भारत हीच जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असेही […]
खरीप परीक्षा बघणार

यंदाच्या खरिपावर कमी पावसाचे सावट असल्याने शेतकऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. परिस्थितीनुसार कडधान्य आणि भरडधान्य पिकांची पेरणी फायदेशीर ठरू शकते. तसेच खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापरही आवश्यक आहे, असे कृषितज्ज्ञ आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. माॅन्सूनची चाहूल लागताच खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू […]