मध्य प्रदेशात लसूण पिकाला भाजीपाला म्हणून मान्यता

लसूण हे मसालावर्गीय नाही तर भाजीपाला पीक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात लसूण पीक हे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त झाले असून, आता शेतकऱ्यांना त्याची कोठेही विक्री करता येणार आहे. त्यासोबतच या निकालामुळे गेल्या आठ वर्षांपासून सुरु असलेल्या वादावरही पडदा पडला आहे. बाजार समिती कर्मचाऱ्याच्या उपस्थितीतच लिलाव होत लसणाचे व्यवहार करण्याची पद्धती मध्य […]

द्राक्षाचे २५ टक्क्यापर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता

मॉन्सूनोत्तर पावसाने सप्टेंबर महिन्यांच्या सुरवातीला नाशिक विभागात द्राक्ष पिकाला दणका दिला. त्यामध्ये आगाप छाटण्यामध्ये बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत पीक संरक्षण खर्च वाढता राहिला. त्यामध्ये पारंपरिक वाण व लांबट वाणांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादनात २५ टक्क्यापर्यंत यंदा घट शक्य असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये छाटणी […]

डॉलर अर्नरच्या दबदब्यासाठी

महाराष्ट्र राज्यातून गेल्या नऊ महिन्यांत २२ हजार टनांहून अधिक डाळिंबाची निर्यात झाली आहे. देशाच्या तुलनेत हे डाळिंब निर्यातीचे प्रमाण ७८ टक्के आहे डाळिंबाला सध्या दरही चांगला मिळत आहे. असे असले तरी यावर्षी निर्यातीसाठी झालेल्या बागांच्या नोंदणीच्या तुलनेत झालेली निर्यात कमीच आहे. जागतिक बाजारातही आपला वाटा नगण्यच आहे. सध्या मिळत असलेला कांदा दर हा हंगाम संपत […]

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीस प्रारंभ

यावर्षी द्राक्षशेतीसमोर अखंड अस्मानी संकट ओढवले. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. ८ हजार ८३९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरवात झाली असून सौदी अरेबिया व दुबई या देशांमध्ये ९ कंटेनर मधून १७२ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

देशात कापसाची पहिल्या तिमाहीत ४१ टक्के विक्री

चालू हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात १२४ लाख गाठी कापसाची आवक झाली. देशातील अंदाजित उत्पादनापैकी जवळपास ४१ टक्के कापसाची विक्री ३१ डिसेंबर झाली. पहिल्या तिमाहीचा विचार करता यंदाची आवक गेल्या वर्षापेक्षा जास्त होती, अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.कापसाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरु होतो. म्हणजेच कापसाचा हंगाम सुरु होऊन आता ३ […]

द्राक्ष बागेत शास्त्रीय पद्धतीने प्लास्टिक कव्हरचा योग्य वापर

मागील काही वर्षात बदलत्या हवामानामुळे विशेषतः अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या नुकसानीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या काही बागायतदारांनी द्राक्ष बॅग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. निफाड भागात गारपिटीमुळे नुकसान होऊ नये म्हणून द्राक्ष बागेत प्लास्टिक कव्हरचा वापर वाढला आहे. मागील काही वर्षात बऱ्याच भागांमध्ये प्लास्टिक कव्हर लावले गेले काहींना यात यश मिळाले. […]

देशात हळदीच्या क्षेत्रात ३५ हजार हेक्टरने घट

हळद लागवडीच्या काळात वाढते तापमान, गतवर्षी झालेला कमी पाऊस, आणि यंदाचा सततचा पाऊस यामुळे देशातील हळद उत्पदक घेणाऱ्या राज्यात या साऱ्याचा परिणाम हळद लागवडीवर झाला. यामुळे लागवड लांबणीवर पडली त्यातच हळद बियाण्याची टंचाई आणि वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशात ३५ हजार हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट झाली असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राने […]

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक फसगत झाल्यास संपर्क साधा; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

येत्या काही महिन्यांत द्राक्षाचा हंगाम सुरु होत आहे. याच काळात व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आमिष दाखवून द्राक्षमाल खरेदी केला जातो. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने या पार्श्वभूमीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी, फसगत झाल्यास तात्काळ नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी;१५ दिवसात २० रुपयांची वाढ

सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांत बेदाण्याची आवक मंदावली असून मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलोस २० रुपयांनी वाढली आहेत. बेदाण्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. गतवर्षी राज्यात बेदाण्याचे तीन लाख उत्पादन झाले होते सध्या राज्यात अंदाजे २५ […]

हवामानातील आव्हाने असतानाही नाशिकने १.६ लाख टन द्राक्ष निर्यात करण्याचे महत्वकांक्षी लक्ष ठेवले आहे

अलीकडच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे आव्हान असतानाही, नाशिक जिल्ह्याच्या कृषी विभागाने या हंगामात सुमारे १.६ लाख टन द्राक्ष निर्यात करण्याचे महत्वकांक्षी लक्ष ठेवले आहे. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या मुख्य द्राक्ष हंगामामुळे या काळात निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.२०२३-२४ हंगामासाठी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील १०,३०० शेतकऱ्यांनी १०,२५३ हेक्टर द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. द्राक्षे आंतरराष्ट्रीय […]