नियमित कर्जदारांना २ लाखांपर्यंत दिलासा द्या, अन्यथा…; किसान सभेचा सरकारला इशारा

शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ५० हजार रुपयांवर बोळवणूक करु नये. त्यांना २ लाख रुपयांचा लाभ देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. नियमित कर्जदारांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा किसान सभेने राज्य सरकारला दिला आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. या प्रश्नी किसान […]

विदर्भात विजांसह पावसाचा इशारा कायम

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (ता. १५) पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि भंडारा, गोंदियात जोरदार पावसाची, तसेच उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, मुजफ्फरनगर, फतेहगड, दाल्तोंगज, तीव्र कमी […]

कृषी समृद्धी’चे थकीत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा, ६०० कोटी निधी मंजूर

कृषी समृद्धी योजनेअंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६०० कोटी निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातून सूक्ष्म सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना व मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत असलेले थकित अनुदान अदा केले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन विभागाने जारी केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२५ रोजी प्रचलित अनुदानाच्या मर्यादेत थेट […]

विदर्भात ३ दिवस पावसाचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भातसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मागील काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह […]

बिगरशेती कर्ज सात दिवसांत मिळणार

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेकडून ठोस उपाययोजना राबविल्या जात आहेत. सचिवांच्या पगारासाठी बँक दरवर्षी २० लाख रुपये देणार असून, बिगरशेती कर्ज सात दिवसांत दिले जाणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे सांगितले. ३० जूनअखेर बँकेच्या कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील २० विकास संस्थांचा सन्मान आणि संस्था पदाधिकाऱ्यांशी […]

जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द करण्याची मागणी

चंद्रपूर गोंडपिंपरी तालुक्यातील करंजीसह १३ गावांतील शेतकऱ्यांनी प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध केला आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक हजार पत्रे पाठविण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी एकता संघर्ष कृती समितीने दिला आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने २५ […]

‘ठिबक सिंचना’साठी ४५ ते ५५ टक्के अनुदान

पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) घटकासाठी दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी ५० लाख १ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी असून, केंद्र व राज्य शासनाचा निधी अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात आहे. याबाबतचा शासन […]

वापर वाढतोय; क्षमतावृद्धीचे काय?

फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘ट्रॅक्टर अँड मेकनायझेशन ऑफ इंडिया’च्या अहवालातून स्पष्ट झाले होते. ट्रॅक्टर विक्रीतील या वाढीस मागील मॉन्सूनचा (जून ते सप्टेंबर २०२५) दमदार पाऊस तसेच जीएसटी कपातीमुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली असल्याचे हा अहवाल सांगतो. मात्र ‘क्रिसिल रेटिंग’सह इतरही काही संस्थांनी एल निनोच्या परिणामामुळे मार्च […]

आता ‘सीएनजी’, ‘पीएनजी’मध्ये बायोगॅसचं मिश्रण? ‘गोबरधन’ योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) बायोगॅस उत्पादनाच्या ‘गोबरधन’ योजनेला मंजुरी दिली. याला भारताची राष्ट्रीय सर्क्युलर बायोएनर्जी योजना म्हणून ओळखले जाणार असून, त्यासाठी एकूण २३,७३१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बायोगॅसचे उत्पादन वाढवणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. गोबरधन योजना आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३५-३६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. शेतपिकांचे […]

‘एल निनो’मुळे शेतीवर संकट, अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट, ‘आरबीआय’चा इशारा

‘एल निनो’मुळे शेती क्षेत्र आणि ग्रामीण मागणी धोक्यात येऊ शकते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीने (RBI MPC Meeting 2026) दिला आहे. सरकारने या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी मॉन्सून हंगामातील कमी आणि असमान पावसामुळे देशांतर्गत आर्थिक वाढीच्या भविष्यातील दृष्टिकोनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण होऊ शकते, असेही स्पष्ट संकेतही देण्यात […]