२०२६-२७ या आर्थिक वर्षात देशाच्या कृषी क्षेत्राची कामगिरी प्रामुख्याने नैॡत्य मॉन्सूनच्या प्रगती आणि वितरणावर अवलंबून राहणार असून, संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे कृषी उत्पादनाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिला आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात (२०२५-२६) मध्ये म्हटले आहे, की हवामानाशी संबंधित जोखीम कायम असली, तरी सिंचन सुविधांमध्ये झालेली वाढ, तांत्रिक प्रगती, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील कृषिपूरक उपाययोजना यामुळे कृषी क्षेत्राला आधार मिळेल.

मॉन्सून हंगामाच्या उत्तरार्धात पर्जन्यवृष्टीस पोषक ठरणारी सकारात्मक द्विध्रुवीय (इंडियन ओशन डायपोल – आयओडी) परिस्थिती हिंद महासागरात विकसित होण्याची शक्यता असल्याने ‘एल निनो’चा प्रतिकूल परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही आरबीआयने नमूद केले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/el-nino-impact-indian-agriculture-rbi-warning-rat16

माहिती शेअर करा