यंदाच्या खरिपावर कमी पावसाचे सावट असल्याने शेतकऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. परिस्थितीनुसार कडधान्य आणि भरडधान्य पिकांची पेरणी फायदेशीर ठरू शकते. तसेच खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापरही आवश्यक आहे, असे कृषितज्ज्ञ आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

माॅन्सूनची चाहूल लागताच खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या खरिपावर दुहेरी संकट आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातही ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे युद्धामुळे खतांची टंचाई आहे. त्यामुळे पीक पद्धतीतही आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे असून, जास्त कालावधीचे पीक घेताना सिंचनाच्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे, असे कृषी तज्ज्ञ जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

‘एल निनो’ वर्षात पावसात मोठे खंडही पडतात. यापूर्वी २०२३ मध्ये ‘एल निनो’चे सावट होते, त्या वेळी पावसात २० ते २८ दिवसांचा खंड पडला होता. हा धोका लक्षात मूग, उडीद, राजमा यांसारख्या कमी कालावधीच्या आणि पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या पिकांची लागवड शेतकरी करू शकतात, असेही कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/kharif-planning-low-rainfall-farming-rat16

माहिती शेअर करा