ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाइपलाइन यामधील फिल्टर, व्हॉल्व्ह, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिगेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. कंट्रोल व्हॉल्व्ह हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर पाण्याचा दाब शेडनेटमधील उपलाइन किंवा लॅटरलच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल, तर बायपासद्वारे जास्तीचे पाणी पुन्हा विहिरीत किंवा स्रोताकडे वळवले जाते. यामुळे सिस्टिम फुटण्याचा धोका टळतो.
शेडनेट हाउसमध्ये पिकांचे दर्जेदार आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत महत्त्वाची असते. या संपूर्ण सिंचन प्रणालीचा सर्वांत मुख्य आणि महत्त्वाचा भाग म्हणजे कंट्रोल हेड प्रणाली. शेडनेट हाउसमध्ये ठिबक सिंचनाची कंट्रोल हेड प्रणाली संपूर्ण पाणीपुरवठा आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करणारी मुख्य यंत्रणा आहे. ही प्रणाली पाण्याचा दाब, स्वच्छता आणि खत मिश्रण व्यवस्थित ठेवते.
ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाइपलाइन यामधील फिल्टर, व्हॉल्व्ह, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिगेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड.
मुख्य घटक पंप
- पंप हा ठिबक सिंचन प्रणालीचा उगमस्थान आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यामधून पाणी उपसून ते योग्य दाबाने शेडनेट हाउसच्या कंट्रोल हेड आणि लॅटरल पाइप्सपर्यंत पोहोचविण्याचे मुख्य काम पंप करतो.
- शेडनेट हाउसमध्ये पिकांच्या अचूक सिंचनासाठी योग्य क्षमतेचा आणि योग्य प्रकारचा पंप निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते.
https://agrowon.esakal.com/agro-special/shade-net-drip-irrigation-system-management-abhi47