द्राक्ष हंगाम मिरज पूर्व,कवठेमहांकाळमध्ये सुरु

यंदा नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर मात करून मिरज पूर्व व कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ झाला आहे. कोंगनोळीतील द्राक्षाची ३०० ते ४०१ प्रति चार किलोस रुपयांनी खरेदी केला जात आहे.बदलत्या हवामानाचा सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्यामुळे वर्षानुवर्षे द्राक्षबागांचे क्षेत्र कमी होत असताना मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आगाप जुलै- ऑगस्ट […]

आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बीजोत्पादन करण्याकडे कल वाढला आहे. राजुरी येथील रघुनाथ हाडवळे यांनी कांदा बीजोत्पादनासाठी लावलेले कांदा पीक भरण्याच्या अवस्थेत असून, ते फुलोऱ्यात आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये यंदा चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षी कांदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी बियाण्यांना सोन्याचा भाव प्राप्त झाला होता. एक हजार रुपयांना मिळणारे कांदा […]

पिवळा वाटाणा आयात पोहचली १२.५४ लाख टनांवर

डाळवर्गीय शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने देशांतर्गत वाटाणा आयातीवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १२.५४ लाख टन आयात भारतात झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचा तुरीसह इतर डाळवर्गीय शेतीमालाच्या दरावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.निर्यात क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जुलैपर्यंत ९.३२ लाख टन, ऑगस्टमध्ये ४३,२४०, सप्टेंबर […]

ई-नाम द्वारे बारामतीत रेशीम कोष विक्री

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीचे महत्व वाढत आहे. पूर्वी कर्नाटकातील रामनगर हीच रेशीम कोष विक्रीसाठी महत्वाची बाजारपेठ होती. अलीकडील काळात मात्र राज्यातच बाजारपेठ तयार होऊ लागल्याने शेतकऱयांची गैरसोय कमी झाली आहे. आता तर बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ऑनलाइन पद्धतीची रेशीम कोष बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयाने १९ जानेवारी २०१९ […]

नॉन पेटंटेड वाणांसाठी द्राक्ष संघाचा पुढाकार

उपलब्ध पेटंटेड द्राक्ष वाण हे ठरावीक निर्यातदार व सभासदांकडे लागवडीसाठी आहेत. त्यांच्या लागवड विस्तारास मर्यादा आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या नॉन पेटंटेड वाणांच्या लागवडीसाठी काडी घेताना एकरी ६० ते ७० हजार असा खर्च आहे. त्यासाठी सर्वच द्राक्ष उत्पादकांची आर्थिक स्थिती नाही. तसेच काड्यांची उपलब्धता होण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणी असणाऱ्या नॉन पेटंटेड वाणांची सर्वसामान्य […]

ऑस्ट्रेलियाचा हरभरा भारतीय बाजारात जानेवारीत येणार

ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादन झालेल्या कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यावर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात येत्या काळात हरभऱ्याचे दर दबावात राहतील, अशी भीती वर्तवली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे. अशातच जानेवारी २०२५ मध्ये ऑस्टेलियाचा हरभरा बाजारात येणार आहे.ऑस्ट्रेलियामध्ये यंदा हरभऱ्याचे बंपर उत्पादन हिऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळेच मोठ्या […]

ऊस शेतीसाठी ‘आयओटी’ तंत्रज्ञानाचा वापर

डिजिटल तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज(आयोटी), ड्रोन रोबोट, वेगवेगळ्या जैविक व अजैविक ताणासाठी ऊस पिकाच्या संपूर्ण कालावधीमधील वर्णक्रमीय प्रतिमीचे संग्रहिकरण, सुदूर संवेदन-भोगौलिक माहिती प्रणाली- वैश्विक स्थान निश्चितीकरण प्रणालींचा समावेश आहे. तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी उपयोगी शाश्वत डिजिटल तंत्रज्ञान आणि साधने विकसित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी क्लिक करा

देशातून डाळिंबाच्या निर्यातीत वाढ

गेल्या दोन ते तीन वर्षात देशातील डाळिंब पिकांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले होते. परिणामी डाळिंबाची उत्पादनात घट असूनही डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा साधल्या. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत जगभरातील ४५ ते ५० देशांतील बाजारपेठेत डाळिंबाची निर्यात झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा डाळिंब निर्यातीत वाढ होऊ लागली असल्याचे चित्र आहे. सन २०२३-२४ या वर्षात डाळिंबाची ७२ […]

ड्रोन अनुदानातील ऑफलाइन पद्धत बंद करण्याचे आदेश

राज्यातील शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनसाठी अनुदान वाटताना सध्याची ऑफलाइन पद्धत तात्काळ बंद करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा ड्रोनची योजना महाडीबीटी संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात २०२२-२३ पासून ड्रोनसाठी अनुदान देण्यास सुरवात झाली होती.त्यामुळे राज्यात किसान ड्रोन अर्थसाह्य सेवा व सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्याने घेतला. […]

ग्लॅडिओलस लागवडीचे तंत्र

ग्लॅडिओलस हे कंदवर्गीय फुलपीक आहे. विविध रंगाची आकर्षक फुले फुलदांड्यावर जास्त काळ टिकून राहत असल्यामुळे बाजारात कटफ्लॉवर म्हणून चांगली मागणी आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही रोशनी, पीडीकेव्ही गोल्ड, पीडीकेव्ही सातपुडा पर्पल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले गणेश, फुले तेजस, फुले निलरेखा, फुले प्रेरणा या जाती विकसित केल्या आहेत. याचबरोबरीने अमेरिकन ब्युटी, नजराणा, […]