राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्प
राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अधिक माहितीसाठी क्लिक करा
आर्थिक ताणातून बळीराजाला बाहेर काढू या
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस २३ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. आज शेतकरी प्रचंड आर्थिक ताण अन् मानसिक विवंचनेत आहे. चला तर आजच्या दिनानिमित्त या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्याचा निर्धार सर्वजण करुया! अधिक माहितीसाठी क्लिक करा
जेव्हा १३० रुपये किलोची द्राक्षे विकावी लागली दहा रुपयांना! द्राक्ष बागायतदारांसमोर अनेक प्रश्न
कसबे सुकेणे (जि.नाशिक) : सध्या परिसरात अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य स्थितीत आल्या असतानाच निसर्गाचा लहरीपणा व बिगरमोसमी पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा सरासरी १३० रुपये किलोने विक्रीसाठी तयार होत्या. त्यात द्राक्षबागा वायनरी उद्योगासाठी केवळ दहा रुपये किलोने विक्रीसाठी द्याव्या लागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Agriculture Bills/ Kisan Bill 2020 : काय आहे कृषी विधेयक? का होतोय याला विरोध?
काय आहे कृषी विधेयक? लोकसभेत सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊलप पुढे टाकताना तीन विधेयके संमत करण्यात आली. शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२०. जाणून घ्या या विधेयकांबद्दल. अधिक माहितीसाठी क्लिक करा
सेंद्रिय, विषमुक्त शेतीचा बांधापर्यंत प्रसार महत्त्वाचा
पुणे : सेंद्रिय व विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा प्रसार अधिकाधिक होणे व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोचणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर या शेतीमालाची बाजारपेठही विकसित व्हायला हवी, असा सूर ‘रोमीफ’ संस्थेच्या पुणे येथे झालेल्या वार्षिक बैठकीत तज्ज्ञांच्या भाषणातून उमटला. अधिक माहितीसाठी क्लिक करा
रेसिड्यू फ्री शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ
शेतकरी आव्हानांचा सामना करीत ‘रेसिड्यू फ्री’ शेतीद्वारे गुणवत्तेचे उत्पादन घेत आहेत. मात्र या मालाला अद्याप सक्षम वा संघटीत बाजारपेठ नाही. अनेकवेळा हा माल बाजार समितीत नियमित शेतमालासोबत आहे त्या दरांत विकावा लागतो. रेसिड्यू फ्री मालाला खात्रीची, शाश्वत आणि विस्तृत बाजारपेठ तयार झाली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आपले कष्ट, बुद्धी व गुणवत्ताप्रधान उत्पादन पिकवल्याचे समाधान मिळेल. […]
सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल..
रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा नैसर्गिक शेती, या पद्धतीच्या वापराविषयी अनेक समज-गैरसमज आधीपासूनच पसरलेले. पारंपरिक शेतीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण मानले गेले. पण, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढू लागली आहे. शेती सुधारणांकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. बायोडायनॅमिक शेती हा सेंद्रीय शेतीचा […]
सेंद्रिय शेती ः एक पाऊल आरोग्याच्या दिशेने
खरं पाहायला गेलं तर सेंद्रिय शेती काही आपल्याला नवी नाही. पूर्वीपासून आपण ती करीत आलो आहोत. मात्र, त्याला शास्त्रीय आधार नव्हता ही गोष्ट मात्र खरी. आजची जीवनशैली आपण अनुभवतो आहोत आणि त्यातील समस्या व त्रुटी या काही नव्या राहिल्या नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या आज उद््भवतात. या सर्वांचा अतिरेक इतका झाला आहे, की आपल्याला सेंद्रिय […]
सिक्कीमचे ‘सेंद्रिय’पाऊल!
निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या प्रकारची शेती करणारे सिक्कीम हे […]