केळीची लागवड झाल्यापासून साधारणपणे ५ ते ६ महिन्यांचा कालावधी कायिक वाढीचा असतो, यामध्ये खोडांची व पानांची निर्मिती खूप महत्वाची असते.

केळीची वाढ पुढील उत्पन्नाचा पाया असतो, दर आठवड्याला एक पान या प्रमाणे महिन्याला ४ पांन व ६ महिन्यात २४-२६ नविन पाने आली तर केळीच्या खोडाची वाढ योग्यप्रकारे होत आहे असे समजावे. सामान्यत: ५.५ ते ६ महिन्यानंतर केळीचे घड बाहेर पडण्यास सुरूवात होते, यालाच केळीची निसवन किंवा कमळ येण्याची अवस्था असे म्हणतात. लागवडीनंतर पहिले ३-४ महिन्यापर्यंत खोडाची वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद , कॅल्शियम व बोरान या अन्नद्रव्यांची गरज असते. दोन पानांमधील अतंर वाढविण्यासाठी कॅल्शियम व बोरान महत्त्वाचे असते. फॅास्फरस व पालाशची गरज खोडाचे पोषण व वाढ होण्यासाठी असते, केळी पिक मुळातच पालाश प्रिय पिक म्हणून ओळखले जाते. कारण केळी पिकांत सर्वाधिक आवश्यकता पालाशची असते. निसवनीच्या काळात नायट्रेट नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यास घड निसटण्याचा धोका असतो, याकाळात फॅास्फरस व पालाशयुक्त खतांचा नैसर्गिक ॲाक्झिन बरोबर वापर केल्यास घड निसटण्याचा धोका कमी होतो.

माहिती शेअर करा