शोभेची झाडे (Ornamental Plants), बागकाम, लँडस्केप डिझाइन शहरी सुशोभीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. या झाडांचा उपयोग फक्त सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही, तर ते पर्यावरणासाठी फायदेशीर आणि व्यवसायिक दृष्टिकोनातूनही लाभदायक ठरतात. कमी खर्चात आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे यांपासून जास्त नफा मिळवता येऊ शकतो. भारत शोभेच्या झाडांच्या उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असून त्याचा १५% वाटा आहे, तर चीन या क्षेत्रात प्रथम स्थानी आहे.

शोभेच्या झाडांच्या वाढीच्या चार मुख्य अवस्थांमध्ये मीडिया बनवणे, शाखीय वाढ, फुलधारणा आणि अजैविक ताण कमी करण्याचा समावेश आहे. प्रत्येक अवस्थेसाठी योग्य खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे.

मीडिया बनवणे: मीडिया बनवण्याचा अर्थ माती किंवा अन्य माध्यमांमध्ये योग्य प्रमाणात खत, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेंद्रिय घटकांचा समावेश करणे. मीडिया तयार करताना न्यूट्रीकोट बॅलन्सड (टाइप १८०), न्यूट्रीकोट बॅलन्सड (टाइप ३६०) आणि बासाकोट प्लस १२ एम कंट्रोल रीलीज फर्टिलायझर्स वापरली जातात. यामुळे दीर्घकाळ अन्नद्रव्याची उपलब्धता  होऊन फुलांची व फळांची संख्या वाढते तसेच झाडांची सर्वांगीण वाढ होते. या कंट्रोल रीलीज फर्टिलायझर्स चे वापर करण्याचे प्रमाण खालील प्रमाणे आहे; हिरवळ (लॉन) साठी २० ते ३० ग्रॅम प्रति वर्गमीटर, सिझनल झाडांसाठी २ ग्रॅम प्रति रोप आणि मोठ्या झाडांसाठी ३० ते १०० ग्रॅम प्रति झाड आहे.

शाखीय वाढ: मीडिया बनवण्याच्या टप्प्यानंतर साधारणतः दहा दिवसांनी चांगल्या शाखीय वाढीसाठी नोवाटेक सोल्युब १४-४८ हे (अर्धा ग्रॅम प्रति लिटर) व ह्युमिस्टार डब्ल्यूजी (४०० ग्रॅम प्रति १००० लिटर) पाण्यात वापरावे. यामुळे मुळांचा चांगला विकास होऊन, फुटव्यांची व फुलांची संख्या वाढते.

फुलधारणा: शाखीय वाढीनंतर फुलधारणेच्या अवस्थेमध्ये बासफोलिअर ०-४०-३७ एसपी फवारणीद्वारे २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आणि एजी सिलॉन २ मिली प्रति लिटर पाण्यात फवारणीद्वारे एकत्र वापरावे. यामुळे झाडाची फुलधारणा चांगली होते आणि अजैविक ताण कमी होतो.

अजैविक ताण कमी करण्यासाठी व झाडे हिरवगार ठेवण्यासाठी: अजैविक ताण कमी करण्यासाठी फेट्रिलॉन कॉम्बी -२ अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात व ए जी सिलॉन अर्धा २ मिली प्रति लिटर पाण्यात फवारणीद्वारे एकत्र वापरावे. यामुळे फुलधारणा चांगली होऊन अजैविक ताण कमी होतो.

माहिती शेअर करा