पालाश हा पिकाच्या पेशीमध्ये पाणी, अन्नद्रव्ये आणि कार्बोहायड्रेटस वहनासाठी गरजेचा आहे. एन्झाईमना चालना देण्यासाठी, पालाश महत्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रथिने, स्टार्च आणि एटीपी निर्मिती होते. एटीपी निर्मितीमुळे प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो. पालाशमुळे पर्णरंध्रांची उघडझाप सुद्धा नियंत्रित होते कि ज्यामुळे पिकाच्या पानातील पाण्याची वाफ, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड अदलाबदल `करण्यास चालना मिळते.पिकातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यास आणि काही प्रमाणात कीड प्रतिकारकशक्ती वाढविण्यात महत्वाचे कार्य करते.
वनस्पतीध्ये अन्न व साखरेच्या वहनासाठी पालाश बरोबर लागणारा महत्वाचा घटक बोरॉन आहे. फवारणीव्दारे जर पालाश दिला तर फळांचे वजन, रंग, व्हिटॅमिन्स, चव आणि टिकवणक्षमता वाढते व आंबटपणा कमी होतो.