सध्याच्या काळात पिकावर कुठलाही रोग आल्यास लगेच रासायनिक औषधांचा वापर केला जातो, खरेतर प्रत्येक पिकामध्ये निसर्गतः रोंगाशी लढण्याची क्षमता असते. पिकमधील एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता पिकाची रोगप्रतिकारक्षमता कमी करू शकते, कारण रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांमध्ये विशिष्ट प्रकारच्या रसायनांची निर्मिती होत असते त्यांना दुय्यम मेटाबोलाइटस् म्हणतात. यासाठी लोह, मॅगनीज, जस्त, तांबे व बोरॅान या सुक्ष्मअन्नद्रव्यांची व कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते. सर्वच पिकांच्या सुरवातीस नत्राची गरज असते परंतु जास्त नायट्रोजनमुळे पेशीभित्तिका बारीक व नाजूक होते, यामुळे पिक रोगांना बळी पडण्यास संवेदनशील होते. फॅास्फरस पिकामध्ये बुरशींविरुद्ध लढण्यासाठी स्वःताची अंतरिक रक्षाप्रणाली(SAR) निर्माण करते. पालाश पिकामध्ये रोगांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी खूप महत्वाचे आहे. पालाशमुळे इपिडरमल पेशीच्या बाह्यभित्तिकेची जाडी वाढते, त्यामुळे जीवाणू, बुरशी व सुत्रकृमींच्या विरूद्धदेखील हे प्रभावी ठरते. असे असले तरी पालाशची प्रमाणापेक्षा वाढलेली पातळी कॅल्शियमच्या कमतरतेस कारणीभूत ठरते व रोगांविरूद्ध प्रतिकारशक्ती कमी होते.
पानांमधील ब्रिक्सची पातळी किड व रोगाविरूद्धची प्रतिकारक्षमता दर्शवते. ब्रिक्सची पातळी कमी म्हणजे पिक रोग येण्यास संवेदनशील तर जास्त ब्रिक्स म्हणजे पिक रोगांविरूद्ध प्रतिकारक्षम. ब्रिक्सच्या पातळीवरून आपण अन्नद्रव्यांची पिकातील पातळी ठरवू शकतो. कमी ब्रिक्स नायट्रेटची जास्त पातळी दर्शविते, तर जास्त ब्रिक्स अन्नद्रव्यांचे संतुलन दाखविते. ब्रिक्सची पातळी नियंत्रित ठेवल्यास पिक रोगांना बळी पडत नाही. ब्रिक्स पातळी नियंत्रित करण्यासाठी दर १५ दिवसांनी बासफोलिअर केल्प O SL व फेट्रिलॉन कॉम्बी २ यांची फवारणी घ्यावी.
अन्नद्रव्यांच्या संतुलित वापराने बुरशीजन्य रोगांविरूद्ध प्रतिकारक्षमता निर्माण करता येते तरी वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशावेळी वनस्पती अर्क, अन्नद्रव्ये किंवा खनिजांपासून, तसेच सुक्ष्मजीवांपासून तयार केलेल्या उत्पादनांचा वापर करून बुरशीजन्य रोगांविरूध्द प्रतिकारशक्ति निर्माण करता येतो.