पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १७ अन्नद्रव्यांपैकी सल्फर हा एक महत्वपूर्ण घटक आहे. गंधकाची गरज जवळजवळ स्फुरदाएवढी असून कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते आहे. मेथिओनाईन (२१%), सिस्टेन (२६%) व सिस्टाईन (२७%) या ॲमिनो ॲसिड मध्ये सल्फर हा एक महत्वपूर्ण घटक आहे. जवळजवळ ९०% सल्फर हे या ॲमिनो ॲसिड मध्ये असते. सल्फर हा घटक तेलबियांमध्ये क्लोरोफिल, कोएन्झाइम् A , बायोटिन, थायमीन, व्हिटॅमिन बी १ , ग्लुट्याथीओन, ग्लुकोसाइडस् व ग्लुकोसिनोलेटस् तयार करण्यासाठी महत्वाचा घटक आहे. तसेच एन्झाइम् आणि सल्फाहायड्रल (-SH) बंध निर्मितीसाठी गरजेचा घटक आहे. सल्फरमुळे तिखटपणा येतो, मुळांची वाढ होते आणि बी भरण्यासाठी मदत होते. या सर्व कारणांमुळे गंधकाचा योग्य वापर केल्यामुळे तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण सरासरी ९-१३% टक्यापर्यँत वाढल्याचे आढळून आले आहे.