केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत रखडलेली कांदा खरेदी अखेर सोमवार (ता. ८)पासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष सुरू होत आहे. शेतकरी व शेतकरी संघटनांच्या मागणीला यश आले असून पाच वर्षांनंतर ही खरेदी बाजार समित्यांमध्ये होत आहे.

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सींच्या माध्यमातून ही खरेदी केली जाईल. ही खरेदी लिलाव पद्धतीने होणार नसून, या संस्थांकडे नोंदणी केलेले शेतकरी केंद्र सरकारने जाहीर केलेला १५८० रुपये क्विंटल दर पटल्यास मालाची थेट विक्री करू शकतील.केंद्राने २ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट दिले असले तरी १ जूनपर्यंत केवळ १५.५० क्विंटलच खरेदी झाली होती. त्यामुळे ३० जूनपूर्वी हे लक्ष गाठण्यासाठी प्रक्रियेला गती दिली जात आहे.

बाजार समित्यांमध्ये आता ‘नाफेड’,‘एनसीसीएफ’ आणि खासगी व्यापारी एकत्र स्पर्धेत उतरणार असल्याने, शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र खरेदी प्रक्रियेत केंद्रीय वखार महामंडळाकडून कांदा खरेदी केल्यानंतर गुणवत्ता व प्रतवारीच्या नावाखाली आडमुठी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे खरेदी आणि साठवणूक कशी होते याकडे लक्ष लागले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/onion-procurement-starts-today-maharashtra-farmers-rat16

माहिती शेअर करा