संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा