बहुतांश पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत नत्राची, फुले येण्याच्या काळात नत्राची व स्फुरदची, तर शेंगा येण्याच्या काळात नत्राची व पालाशची आवश्यकता असते. हि मात्रा जमिनीतून किंवा फवारणीच्या माध्यमातून दिल्यास पिकाची गरज भागवली जाते. याशिवाय पिक उत्पादनात वाढ होते. म्हणून पिकाची आंतरमशागत झाल्यावर वरखतांची विशेषतः उर्वरित मात्रा देणे आवश्यक असते. पिकाचे अनेपक्षित उत्पादन मिळवण्यासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्था, कायिक वाढ आणि वाढीनुसार अन्नद्रव्यांची व विद्राव्य खतांची निवड हि क्रमप्राप्त ठरते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा