उपलब्ध पेटंटेड द्राक्ष वाण हे ठरावीक निर्यातदार व सभासदांकडे लागवडीसाठी आहेत. त्यांच्या लागवड विस्तारास मर्यादा आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या नॉन पेटंटेड वाणांच्या लागवडीसाठी काडी घेताना एकरी ६० ते ७० हजार असा खर्च आहे.

त्यासाठी सर्वच द्राक्ष उत्पादकांची आर्थिक स्थिती नाही. तसेच काड्यांची उपलब्धता होण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणी असणाऱ्या नॉन पेटंटेड वाणांची सर्वसामान्य द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्धता व्हावी, या अनुषंगाने महाराष्ट राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पावले उचलली असून कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा